China: ड्रॅगन म्हणतोय, पाकिस्तान तुझ्यावर भरोसा नाय ना!

पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले झाल्यापासून चीन सातत्याने पाकिस्तानवर आक्षेप नोंदवत आला आहे.
China
ChinaDainik Gomantak
Published on
Updated on

China and Pakistan Relation: पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले झाल्यापासून चीन सातत्याने पाकिस्तानवर आक्षेप नोंदवत आला आहे. त्याचबरोबर चीनने अनेकवेळा कारवाईचीही मागणी केली आहे.

दरम्यान, चीनला बलुचिस्तानमध्ये (Balochistan) लष्करी चौक्या बांधायच्या असल्याचे वृत्त आहे. या चौक्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या प्रकल्पांसाठी आणि चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतील. अलीकडेच पाकिस्तानी लष्कराच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या चीन दौऱ्यादरम्यान बीजिंगने पाकच्या शिष्टमंडळासमोर ही मागणी ठेवली होती.

China
India China Border: सीमेवर ड्रॅगनच्या हालचालीत पुन्हा वाढ

चिनी नागरिकांवरील हल्ल्यांवर आक्षेप घेतला

अहवालानुसार, दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये झालेल्या बैठकीत चिनी अधिकाऱ्यांनी सीपीईसी आणि पाकिस्तानमधील (Pakistan) चीनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर आक्षेप घेतला. तर दुसरीकडे, इस्लामाबाद पोलिसांनी अलीकडेच केंद्रीय पोलीस कार्यालयात (CPO) परदेशी सुरक्षा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

12 जून रोजी सर्वोच्च बैठक झाली

9 ते 12 जून 2022 या कालावधीत पाकिस्तानमधील एका लष्करी शिष्टमंडळाने चीनला भेट दिली. शिष्टमंडळाने चिनी लष्कर आणि इतर सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली. 12 जून रोजी सर्वोच्च बैठक झाली, ज्यामध्ये पाकिस्तानच्या बाजूचे नेतृत्व लष्करप्रमुख (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी केले तर चीनच्या बाजूचे नेतृत्व चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष जनरल झांग युक्सिया यांनी केले.

China
Lockdown in China : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत झांग युक्सिया यांनी बलुचिस्तानमध्ये विशेषतः ग्वादरमध्ये लष्करी चौक्या उभारण्याबाबत चर्चा केली. यावर विचार करण्यासाठी पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने काही वेळ मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

CPEC हे बलुच बंडखोरांचे लक्ष्य

बलुच बंडखोर सीपीईसी प्रकल्प आणि चिनी जवानांवर सातत्याने हल्ले करत असल्याची माहिती आहे. यामागचे कारण म्हणजे बलुच बंडखोर चीनला साम्राज्यवादी मानतात. पाकिस्तान सरकारबरोबरच चीन (China) सरकारही बलुचिस्तानची नैसर्गिक संपत्तीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com