
WWE Legend Hulk Hogan Passes Away
जगभरातील WWE चाहत्यांसाठी आज एक दुःखद बातमी समोर आली आहे. वयाच्या ७१व्या वर्षी सर्वांचे लाडके आणि WWE विश्वाचे दिग्गज कुस्तीपटू हल्क होगन यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रीडा विश्व शोकसागरात बुडाले आहे. WWE चाहत्यांसाठी हे केवळ एक खेळाडू गमावणे नाही, तर त्यांच्या लहानपणाचा, त्यांच्या आठवणींचा एक भाग हरवण्यासारखे आहे.
हल्क होगन यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त करणाऱ्यांची रांग लागली आहे. बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांनीही या महान कुस्तीपटूस भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
वरुण धवन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हल्क होगनचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. त्यावर त्यांनी लिहिले आहे –"तुम्ही संपूर्ण पिढीला प्रेरणा दिलीत. RIP."
त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये "WWE will miss Hulk Hogan. (1953 - 2025)" असेही लिहिले आहे. वरुण धवन हे अनेक वेळा त्यांच्या लहानपणी WWE पाहायचे असल्याचे सांगत आले आहेत. त्यांच्या बालपणातील 'हिरो'च्या निधनामुळे ते visibly दुःखी होते.
अर्जुन कपूर यांनी देखील एक इन्स्टा स्टोरी शेअर करत हल्क होगन यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. "माझ्या आयुष्याचा एक भाग तुमच्यासोबत गेला आहे, हल्क होगन. इतक्या आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद" असे लिहित त्यांनी या दिग्गजाला श्रद्धांजली अर्पण केली.
हल्क होगन यांची शैली, व्यक्तिमत्त्व आणि सिग्नेचर स्टेप्समुळे ते प्रेक्षकांचे लाडके ठरले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ६ वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यांच्या उंचीबद्दल बोलायचं झालं, तर ते तब्बल ६ फूट ७ इंच होते आणि त्यांचे वजन सुमारे १४० किलो होते.
रिंगमध्ये त्यांच्या एन्ट्रीने चाहते अक्षरशः जल्लोष असायचा. त्यांची 'Hulkamania' हे त्यांच्या चाहत्यांसाठी एक चळवळच होती. WWE व्यतिरिक्त त्यांनी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही शोमध्येही काम केलं होतं.
हल्क होगन यांचे खरे नाव टेरी जीन बोलेआ होते. त्यांनी आयुष्यात तीन वेळा विवाह केला होता. त्यांना ‘हल्क मशीन’, ‘मिस्टर अमेरिका’ आणि ‘द सुपर डिस्ट्रॉयर’ अशा टोपणनावांनीही ओळखले जायचे.
हल्क होगन यांच्या जाण्याने जगभरातील लाखो-कोट्यवधी चाहते शोकाकुल झाले आहेत. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सर्व सोशल मीडियावर “#RIPHulkHogan” हा ट्रेंड सुरु आहे. अनेकांनी त्यांच्या आठवणी शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.