
चीनची राजधानी बीजिंगमध्ये जगातील पहिले एआय हॉस्पिटल सुरु झाले आहे. या हॉस्पिटलचे नाव 'एजंट हॉस्पिटल' आहे. ते त्सिंगुआ विद्यापीठातील संशोधकांनी तयार केले आहे. या हॉस्पिटलमध्ये 42 एआय डॉक्टर आहेत. हे डॉक्टर दररोज 3 हजारांहून अधिक रुग्णांवर व्हर्च्युअल उपचार करण्यास सक्षम आहेत. या डॉक्टरांना रोगांचे निदान करण्यासाठी, उपचार योजना तयार करण्यासाठी आणि रुग्णांना दैनंदिन मदत करण्यासाठी परिचारिकांना डिझाइन केले आहे. हे डॉक्टर आणि परिचारिका लार्ज लॅंग्वेज मॉडेलच्या मदतीने स्वायत्तपणे काम करतात.
संशोधकांच्या मते, हे एआय डॉक्टर जगात कोणत्याही प्रकारच्या साथीच्या आजाराचा प्रसार आणि त्यांचे उपचार इत्यादींबाबत माहिती देऊ शकतात. ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एजंट हॉस्पिटलने (Hospital) यूएस मेडिकल लायसन्सिंग परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे 93.6 टक्के अचूकतेने दिली. एजंट हॉस्पिटलचे लिऊ यांग सांगतात की, वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही या भविष्यकालीन व्हर्च्युअल हॉस्पिटलमधून खूप काही शिकायला मिळेल. तसेच, लोकांना कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळू शकतील. एआय डॉक्टरच्या मदतीने अधिकाधिक लोकांना आरोग्य सुविधा पुरवता येतील.
दरम्यान, या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारचे रोबोट काम करतात. काही रोबोट रुग्णांची शारीरिक तपासणी करतात, तर काही शस्त्रक्रियेसारख्या जटिल प्रक्रियांमध्ये मदत करतात. एआयच्या मदतीने हे रोबोट रुग्णांच्या वैद्यकीय अहवालांचे तसेच इतर माहितीचे विश्लेषण करतात. याशिवाय, डॉक्टरांना योग्य उपचारांची शिफारसही करतात.
चीनमध्ये (China) एआय हॉस्पिटलची स्थापना ही वैद्यकीय क्षेत्रातील एका नवीन युगाची सुरुवात आहे. हे केवळ तांत्रिक प्रगतीचे प्रतीक नाही तर भविष्यात आरोग्य सेवा कशा बदलतील हे देखील दर्शवते. जरी या नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, परंतु त्यामुळे रुग्णांवर उपचार निश्चितच अधिक प्रभावी आणि सुलभ होतील. येत्या काही दशकांमध्ये असे उपक्रम जागतिक आरोग्य सेवांसाठी एक आदर्श मॉडेल बनू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.