China Boat Capsized: वेगवान वाऱ्यामुळे हाँगकाँगमध्ये 4 बोट बुडाल्या; दहा पर्यटकांचा मृत्यू, 74 जणांना वाचविण्यात यश

Hong Kong Boat Accident: पर्यटनस्थळांवर होणारे असे अपघात टाळण्यासाठी संबधित विभागांनी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन देखील झीनपीग यांनी केले आहे.
4 tourist boats capsized in china
boat capsized SW China
Published on
Updated on

हाँगकाँग: चीनमधून मोठी बोट दुर्घटना समोर आली आहे. वेगवान वाऱ्यामुळे हाँगकाँगमध्ये चार बोट बुडाल्या असून, यात दहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, ७४ पर्यटकांना वाचविण्यात यश आले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली, असे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने प्रसिद्ध केले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हाँगकाँगमध्ये ८४ पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या चार बोट अचानक बुडाल्या. यातील दहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून, ७४ पर्यटकांना वाचविण्यात आले आहे. वेगवान वाऱ्यामुळे बोटचा तोल बिघडला आणि चारही बोट बुडाल्या, असे चीनच्या वृत्तवाहिन्यांनी म्हटल्याचे रॉयटर्सने नमूद केले आहे.

4 tourist boats capsized in china
गोवा, बँकॉकचे स्वप्न दाखवून भोळ्या भाबड्या वृद्धांची फसवणूक; 35 लाख उकळले, 10 वर्षानंतर महिलेला अटक

हाँगकाँगमधील गुईझो प्रांतात ही घटना घडल्याची चीनच्या झीहुआ वृत्त संस्थेने म्हटले आहे. दुर्घटनेतील काहीजण सुरक्षित बचावले असून, काही जणांना किरकोळ जखम झालीय. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

दर्घटना घडल्यानंतर जवळपास ५०० कर्मचाऱ्यांना बचावकार्यासाठी घटनास्थळी पाठविण्यात आले होते. या घटनेची चीनचे राष्ट्रपती शी झीनपीग यांनी देखील दखल घेतली असून, आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याची सूचना विभागाला देण्यात आला आहेत. पर्यटनस्थळांवर होणारे असे अपघात टाळण्यासाठी संबधित विभागांनी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन देखील झीनपीग यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com