UAE मध्ये 150 पदांची भरती? अधिकाऱ्यांनी केले सत्य उघड

UAE मध्ये सरकारी नोकऱ्यांच्या भरतीबाबतचे वृत्त व्हायरल होत आहे. कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय राष्ट्रीय रुग्णवाहिका प्राधिकरण तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी देत ​​असल्याचे अहवालात म्हटले आहे.
UAE Ambulance
UAE AmbulanceDainik Gomantak
Published on
Updated on

संयुक्त अरब अमिरातीच्या (United Arab Emirates) राष्ट्रीय रुग्णवाहिका प्राधिकरणाशी संबंधित मीडिया रिपोर्ट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कोणत्याही अनुभवाशिवाय UAE मधील हायस्कूल पास लोकांसाठी 150 पदांची भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अहवालात असे म्हटले आहे की, निवड झालेल्या लोकांना पॅरामेडिक्स बनण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल. या लोकांना किमान 14,500 दरमहा म्हणजेच सुमारे 2 लाख 97 हजार रुपये पगाराचे पॅकेज देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

UAE Ambulance
America Research: कोरोनाविरुद्ध 'सुपर इम्युनिटी' मिळवायची असेल...

मात्र, आता राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवेने या वृत्तांचे खंडन केले आहे. कोणताही अनुभव आणि वैद्यकीय पदवीशिवाय ते कोणत्याही व्यक्तीला काम देऊ शकत नाही आणि हे सर्व अहवाल खोटे असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. प्राधिकरणाने सांगितले आहे की, पॅरामेडिकलसाठी नियमानुसार भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

एका निवेदनात, राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवेने आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये मान्यताप्राप्त पदवी असलेल्या UAE मधील लोकांनाच नोकरी देण्याच्या प्रयत्नांवर जोर दिला आहे. एका निवेदनात, प्राधिकरणाने म्हटले आहे की, "राष्ट्रीय रुग्णवाहिकेने, विशेष अधिकारी आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने, युएई मधील तरुणांना पॅरामेडिक बनण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्यांसह नियुक्त केले आहे आणि ते पुढेही चालू ठेवेल."

UAE Ambulance
जासूसी करण्याचा चीनचा बिग प्लॅन! उपग्रहांच्या माध्यमातून बनवतोय ‘मेगाकॉन्स्टेलेशन’

प्राधिकरणातील भरतीची प्रक्रिया काय असणार याची माहिती निवेदनात सांगण्यात आले आहे. त्यानुसार, प्राधिकरणाने संस्थांना पात्र आणि प्रशिक्षित केडर तयार करण्यासाठी, त्यांना शैक्षणिक आणि व्यावहारिक अनुभव प्रदान करण्यासाठी करार केला आहे. या तरुण केडरची पदवीनंतर स्पॉन्सरशिप प्रोग्राम्सद्वारे भरती केली जाते. या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या लोकांना काही अटींवर प्रवेश दिला जातो. मीडिया रिपोर्ट्समध्ये भरतीची प्रक्रियेची जी माहीती सांगण्यात आली ती पूर्णपणे चुकीची असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com