America Research: कोरोनाविरुद्ध 'सुपर इम्युनिटी' मिळवायची असेल...

कोरोना च्या संक्रमणामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मंजूर केलेली कोविड-19 लस घेतल्यास मृत्यूचे प्रमाण आणि गंभीर आजारांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
Super Immunity
Super ImmunityDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या जगात कोरोना चे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर काहींच्या मनात इम्युनिटी च्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहे. परंतू ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या एका नव्या अभ्यासात माहिती समोर आली आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाव्हायरस (covid) विरूद्ध 'सुपर इम्युनिटी'(Immunity) मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. हे दोन्ही मार्ग जवळजवळ समान पातळीवरील वाढीव प्रतिकारशक्ती प्रदान करतात. संशोधकांनी कोविड-19 विरुद्ध लसीकरणासह, नैसर्गिक संसर्गासह आणि त्याशिवाय मानवी रोगप्रतिकारक प्रतिसादाचे प्रमाण, गुणवत्ता यांचा अभ्यास केला.

Super Immunity
हा देश झाला 'मास्क फ्री', कोविड पासची संपली गरज

अभ्यासक फिकाडू टेफेस म्हणाले की, तुम्हाला आधी संसर्ग झाला आणि नंतर तुम्ही लसीकरण केले असेल तर काहीच फरक पडत नाही. तसेच तुम्ही लस घेतली आणि तरीही तुम्हाला संसर्ग होतो. यासंदर्भात ते म्हणाले की, दोन्ही घटणांमध्ये तुम्हाला खरोखर एक अतिशय मजबूत रोगप्रतिकारक प्रतिसाद मिळेल, जो आश्चर्यकारकपणे उच्चप्रतीचा असेल. कोरोना च्या संक्रमणामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मंजूर केलेली कोविड-19 लस घेतल्यास मृत्यूचे प्रमाण आणि गंभीर आजारांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. बर्‍याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हाइब्रिड प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये संक्रमणाची लस नसलेल्या लोकांपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे.

अभ्यासात हे निष्कर्ष आले समोर

संशोधकांनी लसीकरण केलेल्या 104 लोकांच्या न्यूट्रिलाइजिंग एंटीबॉडी मोजले. या लोकांमध्ये हाइब्रिड प्रतिकारशक्ती असलेले लोक, ब्रेकथ्रू संसर्ग (लसीकरणानंतरही संसर्ग होणे) आणि संसर्गाचा इतिहास नसलेले लोक समाविष्ट होते. सर्व लोकांना फाइजर (Pfizer) द्वारे लसीकरण करण्यात आले आणि तीन गटांमध्ये विभागले गेले. यापैकी 42 जणांना कोणताही संसर्ग न होता, 31 जणांना संसर्ग झाल्यानंतर लसीकरण करण्यात आले आणि 31 जणांना लसीकरणानंतरही संसर्ग झाला.

Super Immunity
'हा' देश नो स्मोकिंग झोन म्हणून घोषित?

अभ्यास लेखकांचे असे म्हणने आहे की, "आम्हाला नैसर्गिक संसर्गानंतर आणि लसीकरणानंतरही संसर्ग झालेल्या लोकांमध्ये मानवी रोगप्रतिकारक शक्ती आढळली. त्याच वेळी, लसीकरणानंतरच्या वयासोबत एंटीबॉडी प्रतिसादाचा कोणताही संबंध नसल्याचे अभ्यासातून दिसून आले. संशोधकांनी (Research) असा निष्कर्ष काढला की, लसीकरणानंतरच्या संसर्गाच्या वयात आणि हाइब्रिड रोगप्रतिकारक गटांमध्ये कोणताही संबंध नाही. त्यामुळे एकत्रितपणे, आमचा डेटा असे सुचवितो की नैसर्गिक संक्रमणांमुळे अतिरिक्त एंटीजन एक्सपोजरमुळे मानवी रोगप्रतिकारक प्रतिसादाचे प्रमाण, गुणवत्ता ही लसीकरणापूर्वी वा नंतर लक्षणीय वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com