Wildfires In Greece: जंगलातील आगीचा कहर; शेकडो कुटुंबे बेघर

एकाच ठिकाणी जंगलात लागलेल्या आगीमुळे ग्रीसमधील (Greece) शहरे आगीच्या सावटाखाली आली आहेत.
Wildfires In Greece
Wildfires In GreeceDainik Gomantak
Published on
Updated on

ग्रीसमध्ये (Greece) शनिवारी, तीन वेगवेगळ्या ठिकाणी जंगलाला लागलेल्या आगीमुळे खूपच मोठा विध्वंस झाला आहे. एकाच ठिकाणी जंगलात लागलेल्या आगीमुळे ग्रीसमधील शहरे आगीच्या सावटाखाली आली आहेत. आणि ही आग देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बेटावर पोहोचली आहे. यामुळे, बेटाचा अर्धा भाग आगीने व्यापला आहे.

तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आयव्हियाच्या उत्तर टोकाजवळील समुद्रकिनाऱ्यावरील पेफकी (Peffkey) येथे दोन तटरक्षक जहाजांसह एकूण दहा जहाजे आवश्यक असल्यास अधिक रहिवासी आणि पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी तयार आहेत. उत्तर आयव्हियामध्ये, अग्निशामक दलांनी 7,000 लोकसंख्या असलेल्या इस्टिया शहर आणि आसपासच्या अनेक गावांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घनदाट जंगलातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी बुलडोझरचा वापर केला. शुक्रवारी रात्री, सुमारे 1,400 लोकांना समुद्रकिनारी असणारी गावे आणि बेटांमधून बाहेर काढण्यात आले.

Wildfires In Greece
'त्या' अणुबॉम्बच्या स्फोटने जपानसह सर्व जग कसे हादरले; जाणून घ्या

आग प्राचीन ऑलिम्पियापर्यंत पोहोचली

ग्रीसच्या दक्षिण पेलोपोनीज द्वीपकल्पातील फोकिडा आणि अथेन्सच्या उत्तरेकडील मध्य ग्रीसमध्येही आग लागली आहे. आग ऑलिम्पियामधील प्राचीन स्थळापासून दूर गेली आहे, परंतु पूर्वेकडील गावांना या आगीचा धोका वाढला आहे. अथेन्सच्या उत्तरेस पर्निथा पर्वतावर अजूनही आग आहे, जी अधूनमधून भडकते. तथापि, अग्निशमन सेवेच्या प्रवक्त्याने सांगितले की, आग विझवण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. नागरी संरक्षण उपमंत्री निकोस हदलियास म्हणाले की, अग्निशमन दलाला आशा आहे की ते लवकरच आग आटोक्यात आणतील.

Wildfires In Greece
Talibanला रोखण्यासाठी अमेरिकेचे मोठे पाऊल

स्केल 45 अंशांवर पोहोचले

अत्यंत गरम वाऱ्यांमुळे शुक्रवारी एका अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून गेल्या आठवड्यात किमान 20 लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. येथील तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी शनिवारी अथेन्समधील अग्निशमन विभागाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. दक्षिणी पेलोपोनीजच्या मणि प्रदेशातील एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे 70 टक्के क्षेत्र जंगलातील आगीमुळे नष्ट झाले आहे.

Wildfires In Greece
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन

आगीच्या कारणांचा तपास सुरु

आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरु आहे. शुक्रवारी, हेतुपुरस्सर दोन ठिकाणी आग लावल्याच्या संशयावरुन ग्रेटर मध्य आणि दक्षिणी ग्रीसमध्ये तीन लोकांना अटक करण्यात आली, 47 वर्षीय ग्रीक नागरिकाला शनिवारी दुपारी पेट्रोपोलीच्या अथेन्स उपनगरात अटक करण्यात आली. तसेच ग्रीक आणि युरोपियन अधिकाऱ्यांनी दक्षिण युरोप ते दक्षिण इटली (Italy) आणि तुर्की पर्यंतच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागलेल्या आगीसाठी हवामान बदलाला जबाबदार धरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com