Talibanला रोखण्यासाठी अमेरिकेचे मोठे पाऊल

मात्र आता अमेरिकेने तालिबानला (Taliban) रोखण्यासाठी पूर्ण सैन्य तयारी केली आहे.
Taliban US Air Force
Taliban US Air ForceDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकी आणि नाटो सैन्य माघारी परतल्यानंतर तालिबान ने अफगाणिस्तानच्या राजकिय सत्तेला आव्हान देण्यास सुरुवात केली. मात्र आता अमेरिकेने तालिबानला रोखण्यासाठी पूर्ण सैन्य तयारी केली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबान्यांना निशाणा करण्यासाठी बी -52 बमवर्षक विमान आणि स्पेक्टर गनशिपला अफगानिस्तानमध्ये पाठविण्याचे आदेश (Taliban US Air Force) देण्यात आले आहेत. शीतयुद्धाच्या वेळी बी -52 बमवर्षक विमाने 1950 दशकामध्ये पाठवण्यात आली होती.

व्ही एस -130 स्पेक्टर गनशिपची वैशिष्ट म्हणजे 25 वीम की गन, 40 व्हीबोफोर्स तोफ आणि 105 व्हिडियो एम 102 तोफ लावण्यात आली आहे. या जमिनीवरुन हवेत निशाणा साधू शकतात. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर लगेच तालिबानने संपूर्ण देशामध्ये पाय पसरण्यास सुरुवात केली. दरम्यान तालिबान्यांना रोखण्यासाठी अफगाण लष्कर लढा देत आहे. मागील चोवीस तासामध्ये तालिबानने अफगाण प्रांताच्या दोन राजधान्यांवर कब्जा करण्यात यश आले आहे.

Taliban US Air Force
Afghanistan मध्ये तालिबानची पकड मजबूत; सरकार नियंत्रित शहर घेतलं ताब्यात

अमेरिकन युध्दपोतावर अफगाण सेना निर्भर

अफगाण वायु सेना अमेरिकाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या विमान आणि हेलिकॉप्टर वर निर्भर आहे. अमेरिकन डिफेंस सूत्रांनी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, बी -52 आणि एस -130 विमान हेलमंद प्रांत मधील कंधार, आणि लश्कर गाह जवळील तालिबान्यांना निशाणा करण्यासाठी पाठविण्यात आली आहेत.

Taliban US Air Force
हॉंगकॉंगवरील पकड मजबूत करण्यासाठी 'ड्रॅगन'कडून नवे कारस्थान 

झरंज हे प्रसिद्ध ऐतिहासिक शहरांपैकी एक

झरंज (Zranj) हे देशाच्या दुर्गम भागात वसलेले शहर आहे, ज्याची लोकसंख्या 63,000 आहे. सीमावर्ती शहर असल्याने झरंज हे मोठ्या प्रमाणावर कायदेशीर आणि बेकायदेशीर व्यापारांचे घर आहे. निमरुझला ताब्यात घेतल्यास तालिबानला सीमाशुल्कातून उत्पन्नाचा दुसरा स्रोत मिळेल. निमरुझ प्रांताची सीमा इराण आणि पाकिस्तानशी आहे आणि झरंज हे युद्धग्रस्त देशाच्या प्रसिद्ध ऐतिहासिक शहरांपैकी एक मानले जाते. अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक हेलमंद नदी देखील शहरातून इराणकडे जाते. तत्पूर्वी, तालिबान्यांनी ताबा घेतल्यानंतर पुरुष, महिला आणि मुले इराण सीमेच्या दिशेने धावताना दिसले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com