भारत-जपान संबंध सुधारण्यासाठी कटिबद्ध: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी जपानमधील टोकियोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जपानमधील टोकियोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत-जपान संबंध सुधारण्याची कटिबद्धता व्यक्त केली. भारत आणि जपानची चांगली मैत्री आहे, असे देखील पंतप्रधान म्हणाले. (Prime Minister Narendra Modi said that India and Japan are committed to improving relations)

दरम्यान, भारताच्या (India) विकासामध्ये जपानने (Japan) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जपानशी भारताचे संबंध अध्यात्माचे, सहकार्याचे आणि आपुलकीचे आहेत. हिंसा, अराजकता, दहशतवाद, हवामान बदल यासारख्या आव्हानांपासून मानवतेला वाचवण्यासाठी जगाने बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Prime Minister Narendra Modi
भारत-जपान यांच्या राजनैतिक संबंधांची 70 वर्षे पूर्ण, 'जपानी पंतप्रधान म्हणाले...'

भारताच्या विकासाच्या प्रवासाचा संदर्भ देताना पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) म्हणाले, ''भारताने 'मेड इन इंडिया' कोविड-19 लस आपल्या करोडो नागरिकांना पुरवली आणि 100 हून अधिक देशांमध्ये पाठवली. जागतिक आरोग्य संघटना (WHO) भारताच्या आशा भगिनींचा देखील सन्मान केला आहे. डायरेक्टर जनरल्स-ग्लोबल हेल्थ लीडर्स पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. भारतातील लाखो आशा भगिनी, मातृत्वापासून ते लसीकरणापर्यंत, पोषणापासून स्वच्छतेपर्यंत देशाच्या आरोग्य मोहिमेला चालना देत आहेत.'' आपली ही क्षमता सिध्द करण्यात जपान महत्त्वाचा भागीदार असल्याचे ते म्हणाले.

Prime Minister Narendra Modi
जपान भारतात करणार 3.2 लाख कोटींची गुंतवणूक

ते पुढे म्हणाले, ''मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे असो, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असो, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असो, ही भारत-जपान सहकार्याची उत्तम उदाहरणे आहेत. आम्ही लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे माध्यम बनवले आहे. भारतात लोकांनी नेतृत्व केले. शासन आज खऱ्या अर्थाने कार्यरत आहे. शासनाचे हे मॉडेल सर्वसमान्यांसाठी बनवले जात आहे. लोकशाहीवरील विश्वास दृढ होण्याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com