जपान लष्कराचे Black Hawk Helicopter बेपत्ता, 10 क्रू मेंबर्स अडकले; पीएम किशिदा म्हणाले...

Japan Black Hawk Helicopter: जपानी लष्कराचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर गुरुवारी बेपत्ता झाले. विमानात 10 जण होते. हेलिकॉप्टरच्या शोधासाठी ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
 Black Hawk Helicopter
Black Hawk Helicopter Dainik Gomantak
Published on
Updated on

Japan Black Hawk Helicopter: जपानी लष्कराचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर गुरुवारी बेपत्ता झाले. विमानात 10 जण होते. हेलिकॉप्टरच्या शोधासाठी ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

PM Fumio Kishida देखील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संरक्षण मंत्रालय चौकशी करत आहे. सर्व क्रू मेंबर्स वाचले जातील असा दावा पंतप्रधानांनी केला आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर (UH-60JA) एका ट्रेनिंग ड्रिलवर होते. गुरुवारी संध्याकाळी मियाको बेटावरुन अचानक गायब झाले. हा परिसर तैवानच्या (Taiwan) जवळ आहे. चिनी लढाऊ विमाने या भागात अनेकदा उड्डाण करतात.

 Black Hawk Helicopter
Japan: जपानच्या या बौद्ध मंदिरात प्रसादात मिळते वाईनची बाटली, जाणून घ्या पौराणिक इतिहास

नौदल आणि तटरक्षक दल शोधकार्यात गुंतले

बेपत्ता हेलिकॉप्टरचा (Helicopter) शोध घेण्यासाठी चार विमाने सेवेत लावण्यात आली आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही. कोस्ट गार्डला बेपत्ता हेलिकॉप्टरचे काही पार्ट सापडले आहेत, परंतु अधिकाऱ्यांनी पुष्टी करण्यास नकार दिला.

 Black Hawk Helicopter
Japan सरकारचे अजब-गजब आवाहन; महसूलात वाढ करण्यासाठी ठेवली मद्यपान स्पर्धा

तसेच, हेलिकॉप्टर जपानच्या दक्षिणेकडील मुख्य क्यूशू बेटावरील कुमामोटो प्रीफेक्चरमधील तळाचे असल्याचे जपानी लष्कराने सांगितले. ते मियाको बेटावर पाळत ठेवण्यासाठी गेले होते. मियाको बेटावरील तळावरुन उड्डाण केल्यानंतर तासाभरात हेलिकॉप्टर रडार टप्प्यातून गायब झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com