White House मध्ये चाललेयं तरी काय? आक्षेपार्ह वस्तू सापडल्याने खळबळ

Joe Biden: राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी असलेल्या वेस्ट विंगमध्ये कॅबिनेट कक्ष, आणि प्रेस कक्ष आणि बायडन यांच्या कर्मचार्‍यांसाठी कार्यालये आहेत.
White House
White HouseDainik Gomantak
Published on
Updated on

Cocaine in White House: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये रविवारी रात्री उशिरा सीक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यांच्या गस्तीदरम्यान संशयास्पद पांढरी पावडर आढळून आल्याने खळबळ उडाली.

अधिकाऱ्यांनी घाईघाईने इमारत बंद करून तपासणी केली. ही पावडर कोकेन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये ही सर्व घटना घडली, त्यावेळी बिडेन तेथे उपस्थित नव्हते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेस्ट विंगमध्ये ही पावडर सापडली होती, मात्र अधिक तपशील देण्यात आलेला नाही. अध्यक्ष जो बिडेन राहत असलेल्या निवासस्थानाशी वेस्ट विंग जोडलेले आहे.

यात ओव्हल ऑफिस, कॅबिनेट रूम आणि प्रेस एरिया आणि राष्ट्रपतींच्या कर्मचार्‍यांसाठी कार्यालये आणि कार्यस्थळे आहेत. शेकडो लोक नियमितपणे वेस्ट विंगमध्ये काम करतात किंवा भेट देतात.

White House
Anti Indian Posters In Australia: कॅनडानंतर ऑस्ट्रेलियात खलिस्तान्यांचा विषारी प्रचार, भारतीय अधिकाऱ्यांवर साधला निशाणा

सीक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, रविावारी वेस्ट विंगमध्ये एक अनोळखी वस्तू सापडली, ज्यामुळे सावधगिरी म्हणून व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्स तात्पुरते बंद करण्यात आले. या वस्तूची नंतर चाचणी करण्यात आली, त्यावेळी ती वस्तू कोकेन असल्याचे आढळले.

White House
Tallest Tree: जगातील 'या' सर्वात उंच झाडावळ जाण्यासाठी का आहे बंदी? जाणून घ्या कारण

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ती धोकादायक वस्तू आहे की नाही हे शोधण्यासाठी अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले होते.

ही पांढरी पावडर व्हाईट हाऊसमध्ये कशी आली याचे कारण आणि पद्धत तपासण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com