Anti Indian Posters In Australia: कॅनडानंतर ऑस्ट्रेलियात खलिस्तान्यांचा विषारी प्रचार, भारतीय अधिकाऱ्यांवर साधला निशाणा

Australia: मीडिया रिपोर्ट्सनुसार, 8 जुलै रोजी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दूतावासापर्यंत मोर्चा काढण्याची तयारीही केली आहे.
Khalistani
KhalistaniDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Diplomat: परदेशातील खलिस्तान समर्थक आता त्यांच्या भारतविरोधी कारवाया तीव्र करत आहेत. कॅनडा, अमेरिकानंतर ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी समर्थक आपला अजेंडा पुढे नेण्यात व्यस्त आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचे उच्चायुक्त आणि कौन्सुल जनरलवर खलिस्तानी पोस्टर्स लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये दोन भारतीय राजनयिकांना खलिस्तानी नेता निज्जरचे मारेकरी म्हणून संबोधण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 8 जुलै रोजी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दूतावासापर्यंत मोर्चा काढण्याची तयारीही केली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील (Australia) मेलबर्नमध्ये 29 जानेवारी रोजी खलिस्तान समर्थक आणि भारतीय समर्थकांमध्ये बाचाबाची झाली होती. पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी सार्वमताच्या नावाखाली खलिस्तानी समर्थक जमा झाले होते. यानंतर खलिस्तानी समर्थकांकडून काही हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले.

Khalistani
खलिस्तानी समर्थकांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला लावली आग, FBI करणार तपास; Video

दुसरीकडे, कॅनडात सोशल मीडियावर भारतविरोधी पोस्टर व्हायरल होत आहेत, ज्यावर भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांची नावे आहेत. या मुद्द्यावर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली यांनी मंगळवारी ट्विट केले की, "कॅनडा (Canada) राजनयिकांच्या सुरक्षेबाबत व्हिएन्ना करारांतर्गत आपली जबाबदारी अत्यंत गांभीर्याने घेतो."

Khalistani
Swaminarayan Temple Sydney: सिडनीत स्वामीनारायण मंदिराची तोडफोड, खलिस्तानी ध्वज फडकवला!

जॉली पुढे म्हणाले की, "8 जुलै रोजी नियोजितरित्या ऑनलाइन सामग्री प्रसारित केली जाईल. कॅनडा सरकार भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. ही प्रचार सामग्री अस्वीकार्य आहे.'' काही लोकांच्या कृतीला 'संपूर्ण समुदाय किंवा कॅनडाची संमती नाही' यावरही त्यांनी भर दिला. 'अतिरेकी खलिस्तानी विचारसरणीकडे' लक्ष देऊ नये, असेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com