Pakistan मध्ये दोन नंबरच्या पक्षाकडे पंतप्रधानपद, तर तिसऱ्या स्थानावरील पक्षाला राष्ट्रपतीपद

Nawaz Sharif: यासोबतच नवाझ शरीफ यांनी त्यांची मुलगी मरियम नवाज हिलाही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले आहे.
Shehbaz Sharif will be the new Prime Minister of Pakistan and Asif Ali Zardari will be the President
Shehbaz Sharif will be the new Prime Minister of Pakistan and Asif Ali Zardari will be the President
Published on
Updated on

Shehbaz Sharif will be the new Prime Minister of Pakistan and Asif Ali Zardari will be the President:

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल येऊन अनेक दिवस उलटल्यानंतर आता सरकार स्थापनेचा फॉर्म्युला स्पष्ट होताना दिसत आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांनी सरकार स्थापनेसाठी एकत्र येण्याचे मान्य केले आहे.

सरकार स्थापनेत देशाचा नवा राष्ट्रपती पीपीपीचाच असेल, असा फॉर्म्युलाही ठरवण्यात आला आहे. आसिफ अली झरदारी यांना नवे राष्ट्रपती बनवण्याचा प्रस्ताव पुढे करत असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधी मंगळवारी रात्री एक आश्चर्यकारक घटना समोर आली. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी त्यांचे भाऊ शेहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नामांकित केले.

यासोबतच नवाझ शरीफ यांनी त्यांची मुलगी मरियम नवाज हिलाही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले आहे.

तत्पूर्वी, शेहबाज शरीफ म्हणाले की, मी बिलावल आणि त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांच्याशी बोललो आणि नवाझ शरीफ यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी ट्विट केले की, 'आम्हाला आशा आहे की, आम्ही एकत्रितपणे पाकिस्तानला सर्व राजकीय आणि आर्थिक संकटातून बाहेर काढू शकू, इन्शाअल्लाह.'

Shehbaz Sharif will be the new Prime Minister of Pakistan and Asif Ali Zardari will be the President
India Diplomacy: PAK मधून अभिनंदनची सुटका ते कतारमधील माजी नौसैनिकांच्या सुटकेपर्यंत, मोदी सरकारचे 10 राजनियक विजय

पीएमएल-एन आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान यांचीही मंगळवारी सरकार स्थापनेबाबत बैठक झाली. दोन्ही पक्षांनी परस्पर सहकार्याने पुढे जाण्याचे मान्य केले आणि शेहबाज शरीफ यांनी MQM-P च्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

संसदेत एमक्यूएमचे १७ खासदार आहेत. शेहबाज म्हणाले की, पाकिस्तान तहरीक-ए इन्साफने पीपीपीसोबत युती करण्यास नकार दिला आणि पीएमएल-एन हा एकमेव पक्ष आहे ज्याने पीपीपीला सरकारमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

यापूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यातीतून माघार घेण्याची घोषणा केली होती.

Shehbaz Sharif will be the new Prime Minister of Pakistan and Asif Ali Zardari will be the President
Pakistan Election Results 2024: 'इम्रान, नवाज की बिलावल...', कंगाल पाकिस्तानचा कारभारी कोण होणार?

सरकार स्थापनेसाठी किती जागांची आवश्यक?

सरकार स्थापन करण्यासाठी 266 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये एखाद्या पक्षाला 133 जागांची आवश्यकता असते.

8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत, अपक्ष उमेदवारांनी 101 जागा जिंकल्या, त्यापैकी बहुतांश उमेदवारांना पीटीआयने पाठिंबा दिला.

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने 75 जागा जिंकल्या आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने 54 जागा जिंकल्या. एमक्यूएमने 17 जागा जिंकल्या. याशिवाय इतर पक्षांनी 17 जागा जिंकल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com