Alexei Navalny: व्लादिमीर पुतिन यांच्या कट्टर विरोधकाचा मृत्यू

Manish Jadhav

व्लादिमीर पुतिन यांचा कट्टर विरोधक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक आणि विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात.

Alexei Navalny | Dainik Gomantak

अलेक्सी नवलनी यांचा मृत्यू

पुतिन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी (Alexei Navalny) यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याची माहिती आहे. ते बराच काळ तुरुंगात होते. यमालो-नेनेट्स तुरुंगात त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

Alexei Navalny | Dainik Gomantak

नवलनी यांची तब्येत ठीक नव्हती

यामालो-नेनेट्सच्या जिल्हा प्रशासनाने अधिकृत निवेदनात म्हटले की नवलनी यांची तब्येत ठीक नव्हती. अचानक ते बेशुद्ध झाले, त्यानंतर तात्काळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते, मात्र ते शुद्धीवर येऊ शकले नाहीत.

Alexei Navalny | Dainik Gomantak

मृत्यूचे गूढ

अलेक्सी नवलनी यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Alexei Navalny | Dainik Gomantak

ॲलेक्स यांच्याबाबत खोट्या बातम्या

ॲलेक्स यांच्याबाबत यापूर्वी अनेक अफवा पसरल्या होत्या, यामध्ये त्यांच्या बेपत्ता होण्यापासून ते तुरुंगात विष प्राशन करण्यापर्यंतच्या बातम्या आल्या होत्या. मात्र नंतर त्या बातम्या खोट्या ठरल्या होत्या.

Alexei Navalny | Dainik Gomantak

नवलनी यांना 19 वर्षांची शिक्षा झाली

दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये रशियाला परतल्यावर नवलनी यांना 2013 मध्ये त्यांच्याविरुद्ध आणलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात ताबडतोब तुरुंगात टाकण्यात आले होते.

Alexei Navalny | Dainik Gomantak

2017 मध्येही जीवघेणा हल्ला झाला होता

दुसरीकडे, 2017 मध्ये नवलनी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती.

Alexei Navalny | Dainik Gomantak