Video: अमेरिकेतील गोळीबार थांबेना, ताज्या घटनेत Nevada University मध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू

Las Vegas: याआधी नुकतेच अमेरिकेतील आर्लिंग्टनमध्ये एका घरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या गोळीबारानंतर मोठा स्फोटही झाला होता.
Nevada University Firing
Nevada University FiringDainik Gomantak

Video, Shooting in America does not stop, students die in Nevada University in the latest incident:

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. अमेरिकेतील लास वेगास येथील नेवाडा विद्यापीठात ताजी घटना घडली आहे. येथील विद्यापीठ परिसरात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लास वेगास पोलिसांनी सांगितले की, संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे.

लास वेगास शहर पोलीस विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे."

पोलिसांनी नागरिकांना या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेवर वॉशिंग्टनमधून एक निवेदन आले आहे. वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसने सांगितले की, आम्ही लास वेगासमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना विद्यापीठ कॅम्पसमधील बीम हॉलच्या आसपास घडली, जिथे बिझनेस स्कूल आणि इतर सुविधा आहेत.

तथापि, पीडितांच्या प्रकृतीची माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकली नाही. विद्यापीठ प्रशासनानेही विद्यार्थ्यांना पोस्टमध्ये जागा रिकामी करण्याचे आवाहन केले.

पोलिस अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की, कॅम्पसमध्ये आता आणखी कोणताही धोका नाही. अनेक पीडितांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबाराच्या घटनेच्या कारणाबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Nevada University Firing
North Korea: महिलांना जास्त मुले जन्माला घालण्याचा सल्ला देताना हुकूमशहा भावूक, व्हिडिओ व्हायरल

याआधी नुकतेच अमेरिकेतील आर्लिंग्टनमध्ये एका घरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या गोळीबारानंतर मोठा स्फोटही झाला. यानंतर पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या सर्व रहिवाशांना त्यांच्या घरात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलिसांचे म्हणणे आहे की, ही घटना ब्लूमाउंटमधील एन बर्लिंगस्ट्रीटच्या 800 ब्लॉकमध्ये घडली. पोलिसांनी सांगितले की, अधिकारी निवासस्थानावर शोध वॉरंट बजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका संशयिताने घरात अनेक राऊंड गोळीबार केल्याने स्फोट झाला.

Nevada University Firing
Russia-Ukraine War: युक्रेनला नाटो देशांचा पाठिंबा मिळत नाहीये? जर्मनी म्हणाला - "युक्रेन आमचा मित्र देश नाही..."

दोन मैल दूरवरून स्फोटाचा आवाज ऐकून तो घटनास्थळी पोहोचल्याचे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी आजूबाजूची काही घरे रिकामी केली आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com