अमेरिकेने 86 वर्षांची शिक्षा सुनावलेली पाकिस्तानी डॉक्टर आफिया सिद्दीकी कोण?

अलीकडेच, डॉ.अफिया सिद्दीकीच्या (Afia Siddiqui) समर्थनार्थ हा हॅशटॅग ट्विटरवर प्रचंड ट्रेंड झाला होता. हा हॅशटॅग ट्विटरवर फौजिया सिद्दीकीने (Faujia Siddiqui) ट्रेंड केला होता.
Afia Siddiqui
Afia SiddiquiDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या 16 मुस्लिम देशांमध्ये #free_sister_aafia हॅशटॅग ट्रेंड करत आहे. अलीकडेच, डॉ.अफिया सिद्दीकीच्या (Afia Siddiqui) समर्थनार्थ हा हॅशटॅग ट्विटरवर प्रचंड ट्रेंड झाला होता. हा हॅशटॅग ट्विटरवर फौजिया सिद्दीकीने (Faujia Siddiqui) ट्रेंड केला होता, जी आफिया सिद्दीकीची बहीण आहे. डॉक्टर अफिया सिद्दीकीने गेल्या आठवड्यात तिच्या वकिलास सांगितले होते की, 30 जुलै रोजी तिच्यावर तुरुंगात हल्ला झाला होता. 2003 मध्ये डॉ. अफियाचे तिच्या तीन मुलांसह अपहरण करण्यात आले. असे म्हटले जात आहे की, अमेरिकन (America) सैन्याने तिच्यावर अत्याचार करुन नंतर तिला अफगाणिस्तानमधील (Afghanistan) बाग्राम तुरुंगात (Bagram Jail) कैद केले.

डॉक्टर ऑफियावर हल्ला केल्याचा आरोप

अफगाणिस्तानातील अमेरिकेने बाग्राममध्ये एक कारागृह बांधले जे कैद्यांवर अत्याचार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या महिन्यात तालिबानने काबूल काबीज केले आणि या तुरुंगातील सर्व कैद्यांना सोडले. पाकिस्तानी सरकारच्या वतीने आता अमेरिकन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फोर्ट वर्थ येथील फेडरल मेडिकल सेंटर कार्सवेल जेलमध्ये इतर कैद्यांनी डॉ. अफियावर हल्ला केल्याचे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे.

Afia Siddiqui
रशियातील विद्यापीठात अज्ञातांचा अंदाधुंद गोळीबार, 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू

डॉक्टर आफिया सांगतात की, एक महिला कॉफीचा मग घेऊन आली आणि तिने माझ्यावर चेहऱ्यावर गरम कॉफी फेकली. हल्ल्यानंतर डॉ. अफियाला व्हीलचेअरवर कोठडीत एकांतवासात ठेवण्यात आले. सिद्दीकीच्या वकिलांचे म्हणणे आहे की, जेव्हा आम्ही आफियाला भेटायला गेलो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जखमांचे वृण होते. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, सिद्दीकीने इतर अधिकाऱ्यांना तिच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले परंतु तुरुंग प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.

डॉक्टर अफिया कोण आहे?

डॉक्टर आफिया पाकिस्तानी वंशाची अमेरिकन नागरिक आहे. त्यांनी प्रतिष्ठित मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून पीएचडी केली आहे. ती तीन मुलांची आई आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, मार्च 2003 मध्ये जेव्हा ती तिच्या तीन मुलांसह विमान पकडण्यासाठी विमानतळावर गेली तेव्हा तिला अटक करण्यात आली. टीआरटी वर्ल्डला दिलेल्या मुलाखतीत डॉ. आफियाने सांगितले की, तिचे तिच्या तीन मुलांसह अपहरण करण्यात आले आणि नंतर बाग्राम एअरबेसवर नेण्यात आले. अमेरिकेने तिच्यावर अल कायदाचा सदस्य असल्याचा आरोप केला.

Afia Siddiqui
पाकिस्तानात बॉम्ब स्फोट, 6 चिनी नागरिकांसह 8 जणांचा मृत्यू

असे म्हटले जाते की, वर्ष 2003 मध्ये पाकिस्तान सरकारने डॉक्टर अफियाला अमेरिकन अधिकाऱ्यांकडे आरोपांच्या आधारे अल कायदा सदस्यांवर अमेरिकेकडून निश्चित केलेल्या बक्षीसाची रक्कम मिळवून दिली. आफियाची बहीण फौजियाच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर अमेरिकन सैन्याने तुरुंगात बलात्कार केला आणि तिच्या कबुलीजबाबात स्वाक्षरी होईपर्यंत तिच्यावर अत्याचार केले. त्यांना औषधे दिली गेली, तिला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. त्यानंतर तिला नग्न करुन धिंड काढली.

2010 मध्ये शिक्षा सुनावली

फौजिया व्यतिरिक्त, जेव्हा हे सर्व घडले तेव्हा तिच्या मुलांना तिथेच राहण्यास भाग पाडले गेले. 2008 मध्ये ब्रिटीश पत्रकार यवोन रिडले यांनी पाकिस्तानी माध्यमांसमोर पहिल्यांदा बाग्राम तुरुंगातील एका महिलेचा उल्लेख केला. 2008 मध्ये डॉ.अफियावर अमेरिकन सैनिकांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. 2010 साली डॉ. आफियाला बाग्राममधून अमेरिकेत आणण्यात आले. 19 जानेवारी 2010 रोजी तिच्याविरोधात खटला सुरु करण्यात आला. दोन आठवडे चाललेल्या खटल्यानंतर अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने तिला 86 वर्षांची शिक्षा सुनावली. तिच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, तिच्याबाबतचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही फॉरेन्सिक पुरावा सादर केला गेला नाही. इम्रान खान यांनी सत्तेत आल्यापासून डॉ. आफियाला सोडण्याची मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com