रशियातील विद्यापीठात अज्ञातांचा अंदाधुंद गोळीबार, 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू

ही घटना पेर्म स्टेट (Perm University)युनिव्हर्सिटीची आहे आणि रशियन एजन्सीच्या मते, त्यात काही लोकांचा मृत्यूही झाला आहे.
Firing In Perm University in Russia 8 students died
Firing In Perm University in Russia 8 students died Dainik Gomantak
Published on
Updated on

रशियातील (Russia) एका विद्यापीठात (University) गोळीबार (Firing in Russia) झाल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांपैकी एकाने अचानक गोळीबार सुरू केल्याचे रशियाच्या टास एजन्सीकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.तसेच 4 जण जखमी झाल्याचेहि समजत आहे . रशियन तपासकर्त्यांच्या मते, ही घटना पेर्म स्टेट (Perm University)युनिव्हर्सिटीची आहे आणि रशियन एजन्सीच्या मते, त्यात काही लोकांचा मृत्यूही झाला आहे.सकाळी पेर्म शहरातील एका विद्यापीठात अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला.हल्ल्याच्या वेळी तेथे उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला खोल्यांमध्ये बंद केले.आणि काही जणांनी आपला जीव वाचवण्याठी खाली उद्या देखील घेतल्या आहेत. (Firing In Perm University in Russia 8 students died)

विद्यापीठाचे प्रवक्ते आणि पोलिसांनी सांगितले की मॉस्कोच्या पूर्वेस 1,300 किलोमीटर (800 मैल) पूर्वेला पेर्म स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर बंदूकधारीला ताब्यात घेण्यात आले आहे. या दरम्यान संशयित जखमीही झाला आहे . स्थानिक माध्यमांनी प्ले केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये विद्यार्थी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी पहिल्या मजल्यावरील खिडक्यांवरून उडी मारताना दिसले.

रशियाच्या गृह मंत्रालयाने सांगितले आहे की बंदूकधारीला नंतर ताब्यात घेण्यात आले आहे . या घटनेनंतर चौकशी समितीने हत्येचा तपास सुरू केला आहे. एजन्सीने सांगितले की, बंदूकधारीची ओळख विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून झाली आहे. रशियामध्ये नागरिकांवर बंदुकीच्या मालकी असणाऱ्यांसाठी कठोर निर्बंध आहेत, परंतु ते शिकार, स्वसंरक्षण किंवा खेळासाठी खरेदी केले जाऊ शकतात.

Firing In Perm University in Russia 8 students died
कॅनडातील 'हे' मूल जन्मापासून रडलेलेचं नाही; जाणून घ्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com