US India Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलपूर्वी ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; 4 भारतीय कंपन्यांवरील निर्बंध तात्काळ हटवले

US Lifts Sanctions On Indian Companies 2026: ट्रम्प प्रशासनाने रशियाशी व्यापारी संबंध असल्याच्या आरोपावरुन प्रतिबंधित केलेल्या चार भारतीय कंपन्यांवरील सर्व निर्बंध तात्काळ प्रभावाने हटवले.
US Lifts Sanctions On Indian Companies 2026
donald Trump and pm modiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

US Lifts Sanctions On Indian Companies 2026: भारत आणि अमेरिका यांच्यात आगामी काळात होऊ घातलेल्या 500 दशलक्ष डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण व्यापारी करारापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला. ट्रम्प प्रशासनाने रशियाशी व्यापारी संबंध असल्याच्या आरोपावरुन प्रतिबंधित केलेल्या चार भारतीय कंपन्यांवरील सर्व निर्बंध तात्काळ प्रभावाने हटवले. अमेरिकेच्या वित्त विभागाने या संदर्भात अधिकृत आदेश जारी करुन या कंपन्यांना निर्बंधमुक्त केल्याची माहिती दिली.

रशियाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि इतर साहित्य पुरवल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने (America) या कंपन्यांवर कारवाई केली होती, मात्र आता हा मोठा निर्णय घेतल्याने भारतीय उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला.

US Lifts Sanctions On Indian Companies 2026
India US Trade Deal: 'डील फायनल, पण सही नाही!' भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत पीयूष गोयल नक्की काय म्हणाले?

अमेरिकेच्या वित्त विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, हैद्राबाद येथील 'आरआरजी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'लोकेश मशीन्स लिमिटेड' या दोन कंपन्यांचा समावेश आहे. यासोबतच अहमदाबाद येथील 'गॅलेक्सी बेअरिंग्ज लिमिटेड' आणि नवी दिल्लीतील 'शौर्य एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्यांची नावेही अमेरिकेच्या ब्लॅक लिस्टधून हटवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे आता या चारही कंपन्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्बंधांशिवाय आपले व्यावसायिक कामकाज पूर्ववत करु शकणार आहेत.

US Lifts Sanctions On Indian Companies 2026
India-US Trade Deal: कृषी, डेअरी अन् मॅन्युफॅक्चरिंगसाठी भारताचा 'मास्टरस्ट्रोक', पीयूष गोयल यांनी लोकसभेत 'ट्रेड डील'विषयी स्पष्टच सांगितलं; जाणून घ्या 10 पॉइंट्स

या कंपन्यांवर ऑक्टोबर 2024 मध्ये अमेरिकेने कडक निर्बंध लादले होते. अहमदाबादच्या गॅलेक्सी बेअरिंग्जवर रशियाला उच्च दर्जाचे रोलर बेअरिंग आणि रोलर असेंब्ली निर्यात केल्याचा आरोप होता. शौर्य एरोनॉटिक्सवर रशियाला रडार उपकरणे, रेडिओ नेव्हिगेशनल उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य पाठवल्याचा ठपका होता. तर हैद्राबादच्या आरआरजी इंजिनिअरिंगवर रशियन कंपनी 'आर्टेक्स लिमिटेड'ला मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सच्या 100 हून अधिक खेप पाठवल्याचा आणि लोकेश मशीन्सवर रशियन उत्पादक कंपन्यांना मशीन टूल्सचा पुरवठा केल्याचा आरोप होता.

US Lifts Sanctions On Indian Companies 2026
India-US Trade Deal: कृषी, डेअरी अन् मॅन्युफॅक्चरिंगसाठी भारताचा 'मास्टरस्ट्रोक', पीयूष गोयल यांनी लोकसभेत 'ट्रेड डील'विषयी स्पष्टच सांगितलं; जाणून घ्या 10 पॉइंट्स

अमेरिकेने हे निर्बंध उठवले असले तरी ते कोणत्याही अटींशिवाय हटवले आहेत की त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

US Lifts Sanctions On Indian Companies 2026
America Iran Conflict: "हे युद्ध आपण का लढतोय हे खुद्द अमेरिकेलाही नीट कळलेले नाही"; ‘घाशीराम’ जागतिक सत्तापटलावरचे

सध्या भारत (India) आणि अमेरिका यांच्यात सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सच्या मोठ्या व्यापारी करारासाठी सलोख्याची चर्चा सुरु आहे. या कराराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केले. ट्रम्प पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये या ऐतिहासिक व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात. या महाकरारापूर्वी भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवून अमेरिकेने दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचे संकेत दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Iran talks three hour meeting
Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
India Defence Procurement DAC Approves
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com