Chinook Helicopters: अमेरिकेत ग्राउंड केलेले चिनूक हेलिकॉप्टर भारतासाठी चिंतेचा विषय?

चिनूक हेलिकॉप्टरच्या इंजिनला आग, अमेरिकेने लावले ब्रेक, भारताने बोईंगला मागितले उत्तर
Chinook Helicopters
Chinook HelicoptersTwitter
Published on
Updated on

Chinook Helicopters: भारतीय लष्कराची मोठी शक्ती म्हटल्या जाणार्‍या चिनूक हेलिकॉप्टरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकन लष्कराने आपल्या ताफ्यातील सर्व चिनूक हेलिकॉप्टर ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच सध्या ही हेलिकॉप्टर लष्कराच्या कोणत्याही ऑपरेशन किंवा प्रशिक्षणात वापरली जाणार नाही. चिनूक हेलिकॉप्टरला आग लागण्याच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर भारतानेही याबाबत उत्पादक कंपनीकडून (बोईंग) उत्तर मागवण्यात आले आहे.

अमेरिकेची मोठी कंपनी बोईंगने लष्करासाठी हे खास हेलिकॉप्टर तयार केले आहेत. मार्च 2019 मध्ये भारतीय लष्करानेही त्यांचा वापर सुरू केला. हवाई दलाने आपल्या ताफ्यात 15 चिनूक हेलिकॉप्टरचा समावेश केला होता. ज्याचा लष्कर सातत्याने वापर करत आहे.

Chinook Helicopters
पाकिस्तानात पूर्ण होणार 1947 पासून थांबलेले ऐतिहासिक काम

भारतीय हवाई दलाने बोईंग न्यूज एजन्सीकडून उत्तर मागितले

एएनआयने सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अमेरिकेतील चिनूक हेलिकॉप्टरचे सर्व ऑपरेशन थांबवल्यानंतर, बोईंगला उत्तर देण्यास सांगितले आहे. सध्या भारतीय हवाई दलात चिनूक हेलिकॉप्टरचा वापर सुरू असून, बोईंगकडून माहिती मिळाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. चिनूक हेलिकॉप्टरची तैनाती सध्या दोन ठिकाणी आहे. त्याचा निम्मा ताफा चंदीगडमध्ये आहे, तर काही हेलिकॉप्टर आसाम एअरबेसवरही तैनात करण्यात आले आहेत. त्यांचा उपयोग लष्कराच्या जड वस्तू किंवा शस्त्रे एअरलिफ्ट करण्यासाठी केला जातो.

Chinook Helicopters
Mikhail Gorbachev: माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे 91 व्या वर्षी निधन

चिनूकचे उड्डाण का बंद केले

सध्या अमेरिकेत CH-47 चिनूक हेलिकॉप्टरचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामागे त्याच्या इंजिनमधील बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार, चिनून हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये आग लागण्याचा धोका आहे, या पार्श्वभूमीवर अमेरिकन हवाई दल आणि लष्कराने त्याचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन लष्करी अधिकार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काही चिनूक हेलिकॉप्टरच्या इंजिनला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र या काळात सुदैवाने कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com