Mikhail Gorbachev: माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे 91 व्या वर्षी निधन

सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी रक्तरंजित संघर्षाशिवाय शीतयुद्ध संपवले.
Mikhail Gorbachev
Mikhail GorbachevDainik Gomantak
Published on
Updated on

माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. रशियन एजन्सींनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा हवाला देत त्याच्या मृत्यूची माहिती दिली. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकने सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलच्या निवेदनाचा हवाला देत म्हटले आहे की, त्यांनी दीर्घ आजारानंतर मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. जूनमध्ये किडनीच्या गंभीर आजारामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.

सोव्हिएत युनियनचे (Soviet Union) माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी रक्तरंजित संघर्षाशिवाय शीतयुद्ध संपवले. तसेच सोव्हिएत युनियनचे पतन रोखण्यात ते अयशस्वी ठरले.

मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन झाले

मिखाईल गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) हे युएसएसआरचे (USSR) शेवटचे नेते होते. नागरिकांना स्वातंत्र्य देऊन लोकशाही तत्त्वांच्या धर्तीवर कम्युनिस्ट राजवटीत सुधारणा करू इच्छिणारे एक जोरदार सोव्हिएत नेते मानले जात होते. क्रेमलिनच्या प्रवक्त्याने मीडियाला सांगितले की अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोव्हिएत राजकारण्याच्या मृत्यूबद्दल तीव्र सहानुभूती व्यक्त केली.

1931 मध्ये जन्म झाला

मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी एका गरीब कुटुंबात झाला. 1985 मध्ये सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाल्यानंतर, वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी, त्यांनी मर्यादित राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य आणून प्रणालीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला होता. परंतु त्यांच्या सुधारणा नियंत्रणाबाहेर गेल्या. 1989 मध्ये कम्युनिस्ट पूर्व युरोपातील सोव्हिएत ब्लॉक राष्ट्रांमध्ये लोकशाही समर्थक निदर्शने तीव्र झाली तेव्हा त्यांनी बळाचा वापर करणे टाळले.

शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले

अध्यक्षपद सोडल्यानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांना जगभरात अनेक पुरस्कार (Award) आणि सन्मान देण्यात आले. गोर्बाचेव्ह यांना 1990 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही (Nobel Peace Prize) मिळाला होता. रक्तपात न होता शीतयुद्ध संपवण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आणि याच कारणामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com