पाकिस्तानात पूर्ण होणार 1947 पासून थांबलेले ऐतिहासिक काम

भारत-पाकिस्तान फाळणीचा फटका लाखो लोकांना सहन करावा लागला, पण त्याचा फटका पाकिस्तानातील गुरुद्वारालाही बसला.
Sikh Flag
Sikh FlagDainik Gomantak
Published on
Updated on

भारत-पाकिस्तान फाळणीचा फटका लाखो लोकांना सहन करावा लागला, पण त्याचा फटका पाकिस्तानातील गुरुद्वारालाही बसला. सुमारे आठ दशकांपूर्वी पाकिस्तानातील सियालकोटमध्ये एका गुरुद्वाराच्या बांधकामाला सुरुवात झाली, परंतु 1947 मध्ये भारत, पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे या गुरुद्वाराचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. असे म्हटले जाते की पहिले शीख गुरु नानक देव त्यांच्या चौथ्या उदासी (भ्रमण) दरम्यान या गुरुद्वारामध्ये राहिले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुरुद्वारा नानकसरचे बांधकाम सुमारे 75 वर्षांच्या निराधारानंतर पुन्हा सुरू होत आहे. पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील डास्का तहसीलमध्ये असलेल्या गुरुद्वाराचे बांधकाम 1944 मध्ये सुरू झाले परंतु 1947 मध्ये फाळणीमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. आता असे वृत्त आहे की पाकिस्तानचे इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB) त्याचे बांधकाम पूर्ण करत आहे.

Sikh Flag
Chinese Smartphone Ban: 12 हजारांपेक्षा कमी किंमतीच्या चायनीज स्मार्टफोनवर येणार बंदी!

ईटीपीबीचे अध्यक्ष हबीब उर रहमान म्हणतात की, त्यांनी ऐतिहासिक गुरुद्वारा नानकसरच्या नूतनीकरणाचे आणि जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. हा गुरुद्वारा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील डस्का येथील फतेह भिंदर गावात आहे.

नुकतीच या गुरुद्वाराला भेट देऊन त्याच्या नूतनीकरणाबाबत योग्य मार्गदर्शक सूचना दिलेल्या रहमान यांनी सांगितले की, गुरुद्वाराच्या जीर्णोद्धाराचे काम शीख प्रतिष्ठेनुसार केले जात आहे. पाकिस्तानी इतिहासकार शाहिद शब्बीर सांगतात की, गुरू नानक देव यांच्या चौथ्या उदासीच्या निमित्ताने ते फतेह भिंदर गावात थांबले होते. म्हणून इथे गुरूद्वार बांधण्यात येत आहे.

स्थानिक शिखांनी गुरुद्वारासाठी त्यांच्या जमिनी दान केल्या होत्या आणि अजूनही 10 एकरहून अधिक जमीन गुरुद्वारा नानकसरच्या नावावर आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा भारतातून अनेक शीखांनी पाकिस्तानात जाऊन गुरुद्वारा नानकसरला भेट दिली आणि ती जीर्ण इमारत पाहिली. ही बाब नुकतीच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (SGPC) निदर्शनास आणून देण्यात आली. एसजीपीसीने हे प्रकरण पाकिस्तान सरकारकडे मांडले पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

Sikh Flag
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाचे भारतासाठी भाकीत, यंदा येणार हे मोठे संकट!

2005 साली पाकिस्तानात झालेल्या भूकंपात या गुरुद्वाराच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणावर, ईटीपीबीचे प्रवक्ते अमीर हाश्मी म्हणतात की, आता गुरुद्वाराच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यात इतर अनेक गुरुद्वारा आहेत, ज्यांची अद्याप काळजी घेतली जात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com