Stephan Dujarric
Stephan DujarricDainik Gomantak

Burkina Faso: बुर्किना फासोमधील नागरिकांच्या हत्येवर UN ने व्यक्त केली चिंता, 'या प्रकरणाची...'

Burkino Faso Armed Struggle: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बुर्किना फासोच्या वायव्य शहर नोनामध्ये 28 मुस्लिम पुरुषांचे मृतदेह सापडले.
Published on

Burkino Faso Armed Struggle: पश्चिम आफ्रिकन देश बुर्किना फासोमध्ये लष्कर आणि बंडखोर यांच्यात झालेल्या संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृत्यूबद्दल यूएनने चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणावर चिंता व्यक्त करत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने जलद आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे.

दरम्यान, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बुर्किना फासोच्या वायव्येकडील नोना शहरामध्ये 28 मुस्लिम पुरुषांचे मृतदेह सापडले. सरकार-समर्थित होमलँड डिफेन्स व्हॉलंटियर्स (VDP) च्या सहाय्यक शक्तीने त्यांची हत्या केल्याचा आरोप बुर्किनाबे नागरी समाज संघटनांनी केला.

Stephan Dujarric
Taliban China: ड्रॅगनची तेल निती ! तालिबान-चीन आले एकत्र; काय होणार भारतावर परिणाम

'तपास लवकर व्हावा'

वोल्कर तुर्क, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त म्हणाले की, बुर्किना फासोमध्ये झालेल्या 28 लोकांच्या मृत्यूची त्वरीत चौकशी झाली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, तेथील नागरिकांच्या (Citizens) मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी वॉलंटियर्सची संख्या वाढविण्याचा आग्रह धरत आहे.

'बुर्किनोमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केले जात नाही'

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने यावर एक निवेदन जारी करुन म्हटले की, बुर्किनोमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या बुर्किनो दोन गटांमध्ये संघर्ष सुरु आहे आणि राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. 2022 मध्ये तिथे दोनदा लष्करी उठाव झाला.

Stephan Dujarric
Russia-Ukraine Conflict: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास भारतावर काय परिणाम होणार?

सत्तापालटावर UN प्रमुख काय म्हणाले?

बुर्किना फासोमधील सत्तापालटाचा जागतिक समुदायाने निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी बुर्किना फासोमधील परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टेफन दुजारिक यांनी एका निवेदनात म्हटले की, "महासचिव शस्त्राच्या बळावर सत्ता काबीज करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचा तीव्र निषेध करतात. त्याचबरोबर सर्व नेत्यांना आम्ही आवाहन करतो. लोकांनी हिंसाचारापासून दूर राहून संवाद साधावा."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com