Taliban China: ड्रॅगनची तेल निती ! तालिबान-चीन आले एकत्र; काय होणार भारतावर परिणाम

China And Taliban: अफगाणिस्तानातील तालिबानच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने चीनसोबत आंतरराष्ट्रीय करार केला आहे.
Mining
MiningDainik Gomantak
Published on
Updated on

China And Taliban: अफगाणिस्तानातील तालिबानच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने चीनसोबत आंतरराष्ट्रीय करार केला आहे. दोन्ही देशांनी गुरुवारी उत्तर अमू दर्या खोऱ्यातून तेल काढण्यासाठी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केली. अफगाणिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय करार आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातील चीनचे राजदूत वांग यू आणि आर्थिक व्यवहारांसाठी तालिबानचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादार यांच्या उपस्थितीत काबूलमधील चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या उपकंपनीसोबत हा करार करण्यात आला.

Mining
China Taliban Oil Deal: '...पाकिस्ताननंतर चीनच्या जाळ्यात अफगाणिस्तान', तालिबानबरोबर केला करार!

दुसरीकडे, करारावर स्वाक्षरी केल्यानंतर बरादार म्हणाले की, "या करारामुळे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत होईल" चीन तालिबान सरकारला मान्यता देत नसला तरी राजदूत वांग यांनी सांगितले की, 25 वर्षांच्या करारामुळे अफगाणिस्तानला (Afghanistan) स्वयंपूर्णता मिळेल.

तसेच, तालिबान (Taliban) सरकारचे खाण आणि पेट्रोलियम मंत्री शहाबुद्दीन देलावर यांनी सांगितले की, शिनजियांग सेंट्रल एशिया पेट्रोलियम आणि गॅस कंपनी अफगाणिस्तानमधील पाच तेल आणि वायू ब्लॉक्सचा शोध घेण्यासाठी पहिल्या वर्षी $150 दशलक्ष आणि पुढील तीन वर्षांत $540 दशलक्ष गुंतवणूक करेल. या ब्लॉकमध्ये उत्तर अफगाणिस्तानमधील 4,500 चौरस किलोमीटर (1,737.5 चौरस मैल) क्षेत्रफळ आहे.

Mining
Taliban: खबरदार विद्यापीठात जाल तर!तालिबान्यांचा अफगाणी मुलींसाठी नवा फतवा

त्याचबरोबर, 25 वर्षांच्या करारातून तालिबानला 15% रॉयल्टी फी मिळेल. या पट्ट्यात दैनंदिन तेलाचे उत्पादन 200 टनांपासून सुरु होईल जे हळूहळू 1,000 टनांपर्यंत वाढेल. गेल्या सर्वेक्षणानुसार, अफगाणिस्तानच्या या पाच ब्लॉकमध्ये 87 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा अंदाज आहे. चिनी कंपनी CAPEIC अफगाणिस्तानात पहिली क्रूड ऑइल रिफायनरी देखील बांधणार आहे. चीनी कंपनीने एका वर्षात कराराच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण न केल्यास करार संपुष्टात येईल, अशी माहिती देलावर यांनी दिली.

शिवाय, आशियातील भू-राजकीय तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तान आणि चीन यांच्यातील या महत्त्वपूर्ण करारानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये नवा अध्याय जोडला गेला आहे. या करारानंतर चीन अफगाणिस्तानात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. अफगाणिस्तानच्या पेट्रोलियम आणि वायूच्या साठ्यांशिवाय खनिज साठ्यांवरही चीनची नजर आहे.

Mining
Taliban: पाकिस्तानी सैनिकाची तालिबानकडून निर्घृण हत्या, झाडावर टांगला मृतदेह

त्याशिवाय, नैसर्गिक पेट्रोलियम आणि वायू व्यतिरिक्त, अफगाणिस्तानमध्ये तांबे, जस्त आणि लोह धातूचा प्रचंड साठा आहे. अफगाणिस्तानातील प्रदीर्घ युद्धामुळे ही संसाधने वापरता आली नाहीत. अमेरिकेचा कट्टर विरोधक असलेला अफगाणिस्तान आता गुंतवणुकीसाठी चीनकडे डोळे लावून बसला आहे. आणि चीन देखील...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com