युगांडाने अफगाण निर्वासितांचे केले स्वागत, 51 लोकांना आफ्रिकन देशांमध्ये पोहोचले

यामध्ये पुरुष, महिला आणि मुलांचा (Afghanistan People in Africa) समावेश आहे. मात्र लोकांच्या ओळखीशी संबधित माहिती देण्यात आलेली नाही.
Afghan Refugees
Afghan RefugeesDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने अशरफ घनी यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर आपली सत्ता स्थापन केली आहे. मात्र तालिबानला घाबरुन अनेक अफगाण नागरिकांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता आफ्रिकन देश असलेल्या युगांडाने या अफगाण लोकांचं अर्थात निर्वासितांचं स्वागत केले आहे. एका निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका चार्टर्ड प्लाइटच्या माध्यमातून त्यांना आणण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुरुष, महिला आणि मुलांचा (Afghanistan People in Africa) समावेश आहे. मात्र लोकांच्या ओळखीशी संबधित माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला युगांडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा देश सुमारे 2,000 लोकांना आश्रय देण्यास तयार आहे. या लोकांना गटागटामध्ये आणले जाईल, त्यांना प्रथम तात्पुरत्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि नंतर त्यांच्या कायम निवासस्थानाची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले. (Afghan Refugees in Uganda). निवेदनात असेही म्हटले आहे की, हा निर्णय चिंताजनक असून आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये युगांडाची जबाबदार भूमिका आणि कठीण काळात गरजू आणि निर्वासितांना राहण्याची व्यवस्था करण्यासंबंधीच्या धोरणाला प्रतिबिंबित करते.

Afghan Refugees
अफगाणिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा देण्याचे तालिबानने दिले आश्वासन

युगांडा हा अमेरिकेचा दीर्घकालीन सहयोगी

युगांडा आणि अमेरिका यांचे राजनैैतिक संबंध चांगले राहिले आहेत, मागील अनेक वर्षापासूनच युगांडा अमेरिकेचा सहयोगी देश राहिला आहे. तथापि, जानेवारीमध्ये अध्यक्षपदावर पुन्हा निवडून आलेल्या योवेरी मुसेवेनीचे (Yoweri Museveni) विरोधक आणि कार्यकर्ते म्हणतात की, अमेरिकेबरोबरची व्यवस्था समस्याप्रधान आहे. तथापि, तरीही सरकारने या प्रकरणी अमेरिकेला पाठिंबा दिला आहे. जे अफगाणिस्तानातील नागरिकांना आणि अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या देशांच्या सैन्याला मदत करुन त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी मदत करण्यात येत आहे.

Afghan Refugees
UNSC मध्ये अफगाणिस्तान प्रश्नावर भारताने स्पष्ट केली भूमिका

राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी अफगाण युद्ध संपवले

अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले आहे, अफगाणिस्तानमधील 20 वर्षांचे युद्ध (अफगाण युद्धात अमेरिका) संपवले आहे. त्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आशा व्यक्त केली आहे की, या तारखेपर्यंत सर्व सैन्य मागे घेतले जातील. जिथे एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात की, त्यांचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे आणि ते अमेरिकेच्या आणखी पिढ्यांना अशा देशात युद्ध करण्यासाठी पाठवू शकत नाहीत. तिथे जनता आणि सैन्य स्वतःसाठी लढू शकत नाहीत. तर दुसरीकडे, असे म्हटले जात आहे की, अमेरिकेने स्वतःहून देशाला संकटात सोडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com