Uganda Terror Attack: ISIS च्या दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांना बनवले लक्ष्य, वसतिगृहाला लावली आग; 26 ठार तर...

Uganda Terror Attack: इस्लामिक स्टेट (ISIS) या संघटनेशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांनी आफ्रिकन देश युगांडा येथील शाळेवर हल्ला केला.
Uganda Terror Attack
Uganda Terror AttackDainik Gomantak

Uganda Terror Attack: इस्लामिक स्टेट (ISIS) या संघटनेशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांनी आफ्रिकन देश युगांडा येथील शाळेवर हल्ला केला. यादरम्यान 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत.

तर 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 6 विद्यार्थी बेपत्ता आहेत. या विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हा हल्ला आयएसआयएसशी निगडीत अलायड डेमोक्रॅटिक फोर्सेस (एडीएफ) ने केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, हा हल्ला लुबिरीरा माध्यमिक विद्यालयावर झाला आहे. युगांडाच्या पोलिसांनी सांगितले की, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) सीमेपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मपोंडवे येथील लुबिरीरा माध्यमिक विद्यालयावर शुक्रवारी रात्री एडीएफ बंडखोरांनी हल्ला केला.

दहशतवाद्यांनी (Terrorists) पहिल्यांदा वसतिगृह जाळले आणि त्यानंतर खाद्यपदार्थांचे दुकान लुटले. शाळेतून आतापर्यंत 26 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यात 8 जखमी असून, त्यांना बवेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Uganda Terror Attack
Uganda Government New Law: समलैंगिक संबंध ठेवल्यास फाशीची शिक्षा, 'या' देशात राष्ट्रपतींनी नवीन कायद्याला दिली मंजूरी

दुसरीकडे, आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचा (Students) मृत्यू झाला, याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर सैनिक आणि पोलिसांनी दहशतवाद्यांचा पाठलाग केला, मात्र दहशतवादी विरुंगा राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी सांगितले की, ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबांप्रती आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो.

1998 मध्ये 80 विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली होती

जून 1998 मध्ये, DRC सीमेजवळील किचवांबा टेक्निकल इन्स्टिट्यूटवर ADF हल्ल्यात 80 विद्यार्थी ठार झाले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जाळून मारण्यात आले. तर100 हून अधिक विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले.

Uganda Terror Attack
Uganda ने पारित केला समलैंगिकता विरोधी कायदा, LGBTQ साठी कठोर शिक्षेची तरतूद

दुसरीकडे, ADF ची निर्मिती 1990 च्या दशकात पूर्व युगांडामध्ये झाली. मुस्लिमांवर दीर्घकाळ अत्याचार होत असल्याचा आरोप आहे. यानंतर काही तरुणांनी तत्कालीन राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांच्याविरोधात हत्यार उपसले. 2001 मध्ये युगांडा सैन्याकडून पराभूत झाल्यानंतर, ADF DRC मधील उत्तर किवू प्रांतात हलवले. ADF बंडखोर गेल्या दोन दशकांपासून डीआरसीच्या आतून कार्यरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com