Uganda ने पारित केला समलैंगिकता विरोधी कायदा, LGBTQ साठी कठोर शिक्षेची तरतूद

Anti-Homosexuality Law In Uganda: एका आफ्रिकन देशाने LGBTQ संदर्भात असा कायदा केला आहे की, आता तिथे समलैंगिक संबंध ठेवल्यास कठोर शिक्षा होणार आहे. युगांडाने हा कायदा पारित केला आहे.
LGBTQ
LGBTQDainik Gomantak

Anti-Homosexuality Law In Uganda: एकीकडे जगभरात समलैंगिकांच्या हक्कांवर चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे काही देशांमध्ये समलिंगीविरोधी कडक कायदे लागू केले जात आहेत. यातच, एका आफ्रिकन देशाने LGBTQ संदर्भात असा कायदा केला आहे की, आता तिथे समलैंगिक संबंध ठेवल्यास कठोर शिक्षा होणार आहे. युगांडाने हा कायदा पारित केला आहे.

ANI न्यूज एजन्सीनुसार, युगांडा सरकारने देशात समलिंगी संबंधांसाठी कठोर कायदा केला आहे, जो LGBTQ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणालाही गुन्हेगार ठरवतो.

अहवालानुसार, हा कायदा लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअरसाठी असा पहिला दंडनीय कायदा आहे, जो युगांडाच्या संसदेने सेम-सेक्‍स पार्टनरला (LGBTQ) शिक्षा करण्यासाठी मंजूर केला आहे.

LGBTQ
Uganda: नव वर्षाचा जल्लोष सुरु असताना भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

30 हून अधिक आफ्रिकन देशांनी समलैंगिकतेवर बंदी घातली आहे

ह्युमन राइट्स वॉचचा हवाला देत, अल जझीरा या अरब चॅनेलने अहवाल दिला की 30 हून अधिक आफ्रिकन देशांनी समलैंगिकतेवर बंदी घातली आहे, ज्यात आता युगांडाचाही (Uganda) समावेश आहे.

"बिल विक्रमी वेळेत मंजूर झाले," असे संसदीय स्पीकर अनिता ऍनेट यांनी युगांडामध्ये समलैंगिकतेवर बंदी घालणाऱ्या कायद्यावरील अंतिम मतदानानंतर सांगितले, अल जझीराने हे वृत्त दिले.

कायदा समलैंगिक संबंधांना तसेच समलैंगिक वर्तन आणि समलैंगिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याच्या हेतूला प्रोत्साहन देण्यास प्रतिबंधित करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com