Uganda Government New Law: समलैंगिक संबंध ठेवल्यास फाशीची शिक्षा, 'या' देशात राष्ट्रपतींनी नवीन कायद्याला दिली मंजूरी

Uganda Government: युगांडाचे अध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी देशातील कठोर LGBTQ विरोधी कायद्यांवर स्वाक्षरी केली आहे.
LGBTQ
LGBTQDainik Gomantak
Published on
Updated on

Uganda Government on Same Sex Relationship: युगांडाचे अध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी देशातील कठोर LGBTQ विरोधी कायद्यांवर स्वाक्षरी केली आहे. त्यात समलैंगिकतेसाठी मृत्युदंडाच्या तरतुदीचाही समावेश आहे.

युगांडाच्या सरकारने पाश्चात्य देशांकडून होणारा निषेध आणि डोनर्सच्या निर्बंधांचा धोका पत्करुन हा निर्णय घेतला आहे.

30 पेक्षा जास्त आफ्रिकन देशांप्रमाणेच युगांडामध्ये समलिंगी संबंध आधीच बेकायदेशीर आहेत. मात्र, या बंदीबाबत नवीन कायदा अधिक कडक करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, नवीन समलैंगिकताविरोधी कायद्यात 'सिरियल ऑफेन्डर्स'साठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. यासोबतच समलैंगिक लैंगिक संबंधातून एचआयव्ही/एड्स सारख्या असाध्य रोगांचा प्रसार करण्यावरही कठोर कारवाई केली जाऊ शकते.

याशिवाय, समलैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, युगांडाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या क्लेअर बायरुगाबा यांनी सरकारच्या (Government) या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे.

LGBTQ
Uganda ने पारित केला समलैंगिकता विरोधी कायदा, LGBTQ साठी कठोर शिक्षेची तरतूद

युगांडाचे राष्ट्रपती समलैंगिकतेवर काय म्हणाले

मानवाधिकार कार्यकर्त्या क्लेअर बायरुगाबा आणि इतर कार्यकर्त्यांनी नवीन कायद्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचवेळी, 78 वर्षीय राष्ट्राध्यक्ष मुसेवेनी यांनी खासदारांना 'साम्राज्यवादी दबावाला' विरोध करण्याचे आवाहन केले. मुसेवेनी यांनी मार्चमध्ये मंजूर केलेले मूळ विधेयक खासदारांना परत पाठवले आणि काही तरतुदी नरम करण्यास सांगितले.

मात्र, ज्या प्रस्तावाला राष्ट्रपतींकडून अंतिम मंजूरी मिळाली आहे, त्यात समलैंगिकतेविरोधात नरमाई दिसून येत नाही.

LGBTQ
Uganda School Fire: युगांडा येथे अंध मुलांच्या शाळेला आग, 11 जणांचा मृत्यू

युगांडावर बंदी घातली जाऊ शकते

युगांडाला दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची विदेशी मदत मिळते हे ज्ञात आहे. आता त्याने समलैंगिकतेबाबत इतका कडक कायदा लागू केल्याने त्याला निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते.

विधेयकाचे प्रायोजक असुमन बसलिरवा यांनी सांगितले की, कायद्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर संसदेच्या अध्यक्ष अनिता अमंग यांचा यूएस व्हिसा रद्द करण्यात आला.

युगांडातील (Uganda) यूएस दूतावासाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया आलेली नाही. मार्चमध्ये मंजूर झालेल्या विधेयकाचा व्हाईट हाऊसनेही निषेध केल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com