Uganda School Fire: युगांडा येथे अंध मुलांच्या शाळेला आग, 11 जणांचा मृत्यू

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Uganda School
Uganda SchoolDainik Gomantak

युगांडा (Uganda) देशातील एका अंध मुलांच्या शाळेला आग लागली आहे. या आगीत अकरा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. राजधानी कंपाला येथील मुकोनो जवळ सलामा स्कूल फॉर ब्लाइंडमध्ये पहाटे 1 वाजता ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

(11 Killed in Fire at Uganda School for the Blind, Cause Unknown)

Uganda School
'एक रहो या मरो', Rishi Sunak यांनी पंतप्रधान होताच पक्षाच्या खासदारांना दिला हा संदेश

रॉयटर्सच्या बातमीनुसार, युगांडाची राजधानी कंपाला येथील मुकोनो जवळ सलामा स्कूल फॉर ब्लाइंडमध्ये पहाटे 1 वाजता अचानक आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना किसोगा येथील हेरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. युगांडा पोलिसांनी घटनेचा तपास करण्याची आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com