Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

UAE Demands War Compensation From USA: मध्य-पूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या भीषण संघर्षामुळे आता जागतिक राजकारणाची समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत.
US Iran War Financial Impact UAE
UAE Demands War Compensation From USADainik Gomantak
Published on
Updated on

US Iran War Financial Impact UAE: मध्य-पूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या भीषण संघर्षामुळे आता जागतिक राजकारणाची समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. या युद्धाचा सर्वाधिक फटका बसलेल्या संयुक्त अरब अमिरातीने आता थेट अमेरिकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. "हे युद्ध अमेरिकेने आमच्याशी चर्चा न करता सुरु केले, त्यामुळे या युद्धात झालेल्या अतोनात नुकसानीचा खर्चही अमेरिकेनेच उचलावा," अशी रोखठोक भूमिका युएईने मांडली. वॉशिंग्टनसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जात असून यामुळे आखाती देशांमधील अमेरिकेचे वर्चस्व धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

वॉल स्ट्रीट जनरलच्या वृत्तानुसार, 28 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या युद्धात अमेरिकेला दररोज साधारण 89 कोटी ते 1 अब्ज डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. तर दुसरीकडे, इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे दुबईतील 'फेअरमॉँट द पाम' सारख्या आलिशान इमारती आणि फुजैरा तेल टर्मिनलचे प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, या हल्ल्यात अ‍ॅमेझॉनचे दोन मोठे डेटा सेंटर्स उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण आखाती देशांमधील बँकिंग आणि क्लाउड सेवा कोलमडली. या पार्श्वभूमीवर युएईच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर खालिद मोहम्मद बालामा यांनी अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडे 'करन्सी स्वॅप'ची मागणी केली. होर्मुजच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे डॉलरच्या महसुलात मोठी घट झाल्याने युएईने हा पवित्रा घेतला.

US Iran War Financial Impact UAE
Iran America War: पुन्हा इतिहास मोठं वळण घेईल?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ट्रम्प यांनी आधीच आखाती देशांकडून युद्धाच्या खर्चासाठी पैशांची मागणी करण्याचे संकेत दिले होते, मात्र युएईने ही पूर्ण पटकथाच उलथवून लावली. 1991 च्या खाडी युद्धात सौदी अरब आणि कुवेतने अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सची मदत केली होती, पण आता चित्र बदलले आहे. युएईने स्पष्ट इशारा दिला की, जर अमेरिकेने (America) डॉलरची उपलब्धता करुन दिली नाही, तर ते तेल व्यापारासाठी चिनी 'युआन'चा वापर करण्यास सुरुवात करतील. हा थेट अमेरिकन डॉलरच्या जागतिक वर्चस्वावर केलेला आघात मानला जात आहे.

US Iran War Financial Impact UAE
US Iran War: ट्रम्प यांचा इराणला थेट 'चेकमेट'! अमेरिकन नौदलाकडून बंदरांची नाकेबंदी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचे ढग दाटले

केवळ युएईच (UAE) नाही, तर कतार आणि सौदी अरबलाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. कतारच्या एलएनजी निर्यात क्षमतेचे 17 टक्के नुकसान झाले असून सौदीला आपली 'रास तनुरा' तेल रिफायनरी बंद करावी लागली. दरम्यान, इराणनेही आखाती देशांकडे 270 अब्ज डॉलर्सच्या नुकसानभरपाईची मागणी करत आगीत तेल ओतले. 22 एप्रिल रोजी संपणाऱ्या या दोन आठवड्यांच्या युद्धविरामापूर्वी कोणतीही ठोस शांतता चर्चा यशस्वी झालेली नाही. जर हे युद्ध लांबले, तर अमेरिकेला केवळ लष्करीच नव्हे, तर अब्जावधी डॉलर्सच्या नुकसानभरपाईचेही ओझे सोसावे लागेल, ज्यामुळे अमेरिकेत मोठे आर्थिक संकट ओढवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com