Twitter Verified: ट्विटरमध्ये आणखी एक महत्वपूर्ण बदल, आता व्हेरिफाईड अकाऊंट तीन रंगात

यापुढे ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे.
Elon Musk Twitter Account
Elon Musk Twitter AccountDainik Gomantak
Published on
Updated on

जागप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून अनेक बदल केले आहेत. सुरूवातील मस्क यांनी ट्विटरचा सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली. त्यानंतर व्हेरिफाईड अकाऊंटसाठी पैसे मोजावे लागतील अशी घोषणा केल्यानंतर त्याला स्थिगिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी ट्विटरमध्ये आणखी एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापुढे ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे.

Elon Musk Twitter Account
Emily Sotelo: 48 शिखरे सर करणाऱ्या 19 वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू, 3 दिवसांनी सापडला मृतदेह

येत्या 2 डिसेंबरपासून व्हेरिफाईड ट्वीटर खात्यासाठी निळ्या रंगासह सोनेरी आणि राखाडी अशा तीन रंगाचा मार्क येणार आहे. कंपन्यांसाठी सोनेरी, सरकार आणि सरकारी संस्थांसाठी राखाडी मार्क असणार आहे तर इतरांसाठी निळ्या रंगाची टिक मिळणार आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहे.

Elon Musk Twitter Account
Adani FPO: टार्गेट 20,000 कोटी, देशातील सर्वात मोठा FPO येतोय

तसेच, एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटबाबत देखील मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बनावट अकाऊंटला पूर्णपणे आळा बसवण्यासाठी योग्य मार्ग सापडेपर्यंत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच करणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com