Adani FPO: टार्गेट 20,000 कोटी, देशातील सर्वात मोठा FPO येतोय

अदानी समूहाचा FPO हा देशातील सर्वात मोठा एफपीओ असेल.
Adani FPO
Adani FPODainik Gomantak
Published on
Updated on

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचा 20,000 कोटी रुपयांचा फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) आणणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची शुक्रवारी अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अदानी एंटरप्रायझेसने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये देखील माहिती दिली आहे. अदानी समूहाचा (Adani Enterprises FPO) हा देशातील सर्वात मोठा एफपीओ असेल.

(Adani Enterprises to raise funds in tune of ₹20,000 cr via FPO)

Adani FPO
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, सीमाभागातील 865 गावांना करणार आर्थिक मदत

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडमध्ये सध्या प्रमोटर होल्डिंग 72.63 टक्के आहे, तर FII ची 15.59 टक्के, सामान्य लोकांची 6.46 टक्के आणि म्युच्युअल फंड कंपनीच्या समभागांपैकी 1.27 टक्के हिस्सेदारी आहे. एफपीओ आल्यानंतर, कंपनीतील लोकांची हिस्सेदारी वाढेल, ज्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त शेअर्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील. यामुळे कंपनीच्या शेअर्सचे ट्रेडिंग व्हॉल्यूमही वाढेल. असे अर्थशास्त्राचे तज्ञ लोक सांगत आहेत.

Adani FPO
PNB: पंजाब नॅशनल बँकेचे नाव बदला? याचिकाकर्त्याला सरन्यायाधीश म्हणाले उद्या तुम्ही...

निधी उभारणीच्या प्रस्तावावर 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत विचार केला जाईल असे कंपनीने यापूर्वी म्हटले होते. बोर्डाच्या बैठकीत एफपीओचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता पोस्टल बॅलेटद्वारे भागधारकांची सहमती घेतली जाणार आहे. 20 हजार कोटी रुपयांचा हा देशातील सर्वात मोठा एफपीओ असेल. यापूर्वी, येस बँकेने जुलै 2020 मध्ये FPO द्वारे 15,000 कोटी रुपये उभारले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com