Emily Sotelo: 48 शिखरे सर करणाऱ्या 19 वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू, 3 दिवसांनी सापडला मृतदेह

यापूर्वी 2021 मध्येही मोटेलोने या डोंगराळ भागात भटकंती केली होती.
Emily Sotelo
Emily SoteloDainiik Gomantak
Published on
Updated on

वयाच्या 19 वर्षीय 48 शिखरे सर करणाऱ्या अमेरिकन गिर्यारोहक एमिली मोटेलो (Emily Sotelo) हिचा मृतदेह रविवारी न्यू हॅम्पशायरमधील डोंगराच्या पायथ्याशी सापडला. एमिली मोटेलो गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. बेपत्ता झाल्यानंतर तिला शोधण्यासाठी सोशल मीडियावर अनेक पोस्ट करण्यात आल्या.

एमिली मोटेलोने वयाच्या 19 व्या वर्षी 48 शिखरांवर यशस्वी चढाई करण्याचा विक्रम केला आहे. जगभरातील शिखरे सर करण्याचे एमिली मोटेलोचे स्वप्न होते. यासाठी ती रोज प्रवास करायची.

Emily Sotelo
Adani FPO: टार्गेट 20,000 कोटी, देशातील सर्वात मोठा FPO येतोय

एमिली मोटेलो रविवारी सकाळी घरातून एकटीच फिरायला गेली होती. ब्रिटीश वृत्तपत्र मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, एमिली मोटेलोने सोलो ट्रिपवर होती. एमिलीने रविवारी सकाळी तिच्या घरापासून चालण्यास सुरूवात केली. मात्र ठराविक वेळेनंतर तिचा संपर्क तुटल्यानंतर कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. आणि त्यांनी एमिली बेपत्ता झाल्याची तक्रार केली. शोध सुरू केल्यानंतर, तीन दिवसांनंतर तिचा मृतदेह न्यू हॅम्पशायरमधील माउंट लाफायटच्या वायव्येकडील बाजूला सापडला.

Emily Sotelo
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, सीमाभागातील 865 गावांना करणार आर्थिक मदत

एमिली मोटेलोचा मित्र ब्रायन गार्वे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या अति वेगामुळे हा अपघात झाला असावा. मोटेलोला अनुभवाची कमतरता नव्हती पण अचानक झालेला हा अपघात आहे. यापूर्वी 2021 मध्येही मोटेलोने या डोंगराळ भागात भटकंती केली होती. पण त्या वेळी ती परत आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com