Missing Titanic Submersible: "सुरक्षित राहायचे आहे ना? मग अंथरुणातूनचं बाहेर पडू नका"; बेपत्ता पाणबुडीच्या मालकाची मुलाखत होतेयं व्हायरल

Missing Titanic Submersible: "एखाद्या क्षणी, तुम्ही काही धोका पत्करत असता तेव्हा तुम्हाल यश मिळण्याची शक्यताही असते."
Titanic submarine
Titanic submarineDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Search Continues for Missing Titanic Submersible: टायटॅनिकचा अवशेष पाहण्यासाठी गेलेली आणि रविवारपासून बेपत्ता असलेल्या पाणबुडीच्या कंपनीचे संस्थापक स्टॉकटन रश यांनी सेफ्टी म्हणजे "शुद्ध कचरा" असल्याचे म्हटले होते. रश यांनी 2022 मध्ये एका पॉडकास्टला देलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले होते.

मला म्हणायचे आहे की जर तुम्हाला फक्त सुरक्षित रहायचे असेल, तर अंथरुणातून बाहेर पडू नका, तुमच्या कारमध्ये बसू नका, काहीही करू नका, रशने CBS रिपोर्टर डेव्हिड पोगसह 2022 पॉडकास्टमध्ये सांगितले. एखाद्या क्षणी, तुम्ही काही धोका पत्करत असता तेव्हा तुम्हाल यश मिळण्याची शक्यताही असते. त्यामुळे धोका पत्करणे हा रिस्क-रिवॉर्डचा खेळ आहे.
स्टॉकटन रश, संस्थापक ओशियन गेट

रविवारी बेयपत्ता झालेल्या पाणबुडीमध्ये रश यांच्यासह इतर चार प्रवासी आहेत. यामध्ये अब्जाधीश उद्योगपतींचाही समावेश आहे. पाणबुडी बेपत्ता झाल्यापासून अनेक मोठ्या मोठ्या यंत्राना पाणबुडीचा शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, याला यश आले नाही.

या पाणबुडीचा शोध लागत नसल्याने आता ओशियन गेटचे संस्थापक स्टॉकटन रश यांच्या रिस्क-रिवॉर्ड आणि निडर वृत्ती व विचारांची चर्चा सर्वत्र होत आहे. याला आता त्यांच्या जुन्या मुलाखतीमुळे आणखीच हवा मिळाली आहे

Titanic submarine
Titan Submarine: गूढ आवाजाने हालचाली वाढल्या; बेपत्ता झालेल्या पाणबुडीबाबत मोठी अपडेट

रश यांच्या माजी सहकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

टायटन पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर ओशियन गेट संस्थेचे माजी सल्लागार रॉब मॅक्क्यूलम यांनी स्टॉकटन रश यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. मला स्टॉकटन चांगले माहित की, स्टॉकसन असे काहीतरी करणार हे माहित होते. ते पूर्ण-वेगाने पुढे जाणारे, टारपीडोज टाइप व्यक्ती आहेत. सबमर्सिबल उद्योगात, अत्यंत मोठी संधी आहे आणि ती सोडली जाऊ शकत नाही याची त्यांना जाणिव होती. म्हणूनच स्टॉकसन यांनी या मोहिमेसाठी गडबड केली,

Titanic submarine
Titanic Submarine: उरले फक्त 76 तास...! टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेले ब्रिटिश अब्जाधीश पाणबुडीसह बेपत्ता;

शोध सुरुच

टायटॅनिकचे अवशेष पाहाण्यासाठी गेलेली पाणबुडी अचानक गायब झाली. या पाणबुडीची जबाबदारी ओशनगेटकडे होती. बेपत्ता पाणबुडीचा शोध सुरू आहे. दरम्यान, कॅनडाच्या लष्करी पाळत ठेवणाऱ्या विमानाने या भागात पाण्याखालील स्फोटांचा आवाज ऐकला. कॅनडाच्या P-3 विमानाला शोध क्षेत्रात पाण्याखाली स्फोट झाल्याचे आढळले. मात्र तरीही या पाणबुडीचा शोध लागू शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Indonesia Missing Passenger Ship
Kinshasa Wedding Reception Fire
Nepal Flood Rescue Video
Nepal Flood Missing People
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com