Taliban
TalibanDainik Gomantak

अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन होत नसल्याचे नेमकं 'हे' आहे कारण....

अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यासारख्या सरकारमधील (Taliban Government) राजकीय नेत्यांचा सरकारमध्ये समावेश करण्याबाबतही वेगवेगळी मतमतांतरे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
Published on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) राजवट आली असली तरी सरकार स्थापन करण्यामध्ये तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांमध्ये संघर्ष सुरु आहे. त्यामुळे सरकार (Government) स्थापन करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना तालिबानमधील काही पदाधिकाऱ्यांने सांगितले की, दोहामध्ये उपस्थित असलेल्या इस्लामिक गट आणि हक्कानी गटातील (Haqqani factions) मतभेद हेच मूळ कारण आहे. असे म्हटले जाते की, हक्कानी गट हैबतुल्ला अखुंदाजादा (Haibatullah Akhundzada) यांना सर्वोच्च नेता म्हणून स्वीकारत नाही. माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई (Hamid Karzai) आणि दोन वेळा राष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेले अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यासारख्या सरकारमधील राजकीय नेत्यांचा सरकारमध्ये समावेश करण्याबाबतही वेगवेगळी मतमतांतरे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

Taliban
'तालिबानी' संकट, अफगाणिस्तानात परराष्ट्रमंत्र्यांची महत्वाची बैठक

दरम्यान, हक्कानी गट आणि अखुंदाजादा यांच्या तीन उपप्रमुखांपैकी एक असलेल्या मुल्ला बरादर यांच्यात झालेल्या वादांमुळे संभाव्य अडथळा निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन सरकारमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी बरादार यांच्यावर असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद रविवारी काबूलला रवाना झाले असून संभाव्य संकट टाळण्यासाठी आणि हक्कानीला मोठ्या भावाची भूमिका देण्याबाबत यावी अशी मागणी करत आहेत.

Taliban
अमेरिकेचा अफगाणिस्तानात हवाई हल्ला; 5 तालिबानी अतिरेकी ठार

गेल्या महिन्यात एएफपीच्या अहवालात अफगाणिस्तानात गेल्या दोन दशकातील सर्वात धोकादायक हल्ले घडवून आणल्याबद्दल हक्कानीला दोषी ठरवले आहे. या दहशतवादी संघटनेचा प्रमुख संस्थापक जलालुद्दीन हक्कानी (Jalaluddin Haqqani) यांचा मुलगा सिराजुद्दीनला (Sirajuddin) अमेरिकेच्या एफबीआयकडून वॉंन्टेड म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या अटकेसाठी 50 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. बऱ्याच काळापासून त्याचे पाकिस्तानमधील लष्करी आस्थापनांशी असलेले संबंधही संशयास्पद आहेत. अमेरिकन एंटरप्रायजेस इन्स्टिट्यूटचे रेजिडेंट स्‍कॉलर मायकल रुबिन (Michael Rubin) यांनी अमेरिकास्थित 19FortyFive मध्ये लिहिले की, तालिबान हे ISI चे "कठपुतळी" असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Taliban
अफगाणिस्तानात 100 निष्पाप लोकांची हत्या, तालीबान्यांवर आरोप

पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने सांगितले की, हमीद यांच्या अलीकडील अफगाणिस्तान भेटीमुळे अफगाणिस्तान सरकार पाडण्यात हमीद यांचा हात असल्याचे उघड होते. ते पुढे म्हणाले, "अमेरिकेच्या धोरण निर्मात्यांनी तालिबानशी का बोलावे किंवा हमीदचा हात उघडकीस आल्यानंतर हमीद यांची आपात्कालीन भेट या गोष्टींची पुष्टी करते की तालिबान केवळ आयएसआयचे बाहुले आहे." फैज हमीदला दहशतवादी म्हणून घोषित करा आणि तो ज्या संघटनेचे नेतृत्व करतो त्या संघटनेस दहशतवादी संस्था म्हणून घोषित करा. फैज हमीदने बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानला त्रस्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com