आता 'हा' देशही पाकिस्तानच्या वाटेवर; 2 पेक्षा जास्त बटाटे, टोमॅटो खरेदीवर बंदी

भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा, सुपरमार्केटमधील शेल्फ पडली ओस
Britain SuperMarkets
Britain SuperMarkets Dainik Gomantak

Food Crisis in Britain: सध्या जगात एकामागोमाग एक अशा अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटातून जात आहेत. ब्रिटनची अर्थव्यवस्थाही मंदितून जात आहे. येथे महागाई प्रचंड वाढली आहे. खाद्यपदार्थांचा तुटवडा जाणवू लागला आहे. फळे आणि भाज्यांचाही तुटवडा आहे.

त्यामुळेच आता येथील सुपरमार्केटमध्ये बटाटे आणि टोमॅटो खरेदीवर मर्यादा आणण्यात आली आहे. म्हणजेच पैसे असले तरी तुम्ही येथे बटाटे, टोमॅटो मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकत नाही. येथील सर्वात मोठ्या सुपरमार्केटमध्ये 2 पेक्षा जास्त बटाटे किंवा टोमॅटो खरेदी करता येणार नाहीत.

Britain SuperMarkets
Pakistan Economy Crisis: पाकिस्तानात मंत्र्यांना आता पगार नाही! पंतप्रधान शरीफ यांचा झटका

यूकेमधील बहुतांश सुपरमार्केट शेल्फ रिकामी दिसून येत आहेत. ब्रिटनच्या 4 सर्वात मोठ्या सुपरमार्केट मॉरिसन्स, Asda, Aldi आणि Tesco यांनी ताजी फळे आणि भाज्यांच्या खरेदीवर मर्यादा निश्चित केली आहे. टोमॅटो, बटाटे, काकडी, शिमला मिरची आणि ब्रोकोली या फळे आणि भाज्यांचा यात समावेश आहे.

म्हणजेच एखाद्या व्यक्तीला टोमॅटो घ्यायचा असेल तर तो एक किलो नव्हे तर फक्त 2 ते 3 टोमॅटो विकत घेऊ शकतो. पूर्व लंडन, लिव्हरपूल आणि यूकेच्या अनेक भागांतील दुकानांमधून फळे आणि भाज्या याआधीच गायब झाली आहेत आणि येथे तुटवडा जाणवत आहे. भाजी खरेदीवरही बंधने आली आहेत.

मूळात ही उत्पादने ब्रिटन ज्या देशांमधून आयात करतो, त्या देशांमध्येच या उत्पादनांचे पिक घटले. संबंधित देशातील कृषी संकटामुळे ब्रिटनवर ही वेळ ओढवली आहे. हिवाळ्यात ब्रिटन 90 % फळभाज्या आयात करतो. अशा परिस्थितीत, सुपरमार्केटने स्टॉक ठेवणे आवश्यक होते. पण ते न झाल्याने तुटवडा निर्माण झाला.

फळभाज्यांचे हे संकट कधी संपणार?

ब्रिटनच्या नॅशनल फार्मर्स युनियनचे अध्यक्ष मिनेट बॅटर्स म्हणाले की, डिसेंबरमध्ये आपण अंड्यांचे रेशनिंग केले होते. पुढील काळात ते टाळले पाहिजे. येत्या काही दिवसांत काही वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो. ग्राहकांच्या 'पॅनिक खरेदी' विरोधातही त्यांनी इशारा दिला आहे.

Britain SuperMarkets
Ajay Banga: पुण्यात जन्मलेले अजय बंगा बनणार जागतिक बँकेचे अध्यक्ष

या संकटाला कोण जबाबदार?

ब्रिटिश ग्रोअर्स असोसिएशनचे प्रमुख जॅक वॉर्ड म्हणतात की, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत. यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. किरकोळ विक्रेतेही शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देऊ शकले नाहीत की आम्ही तुम्हाला हवा तो भाव देऊ.

अशा परिस्थितीत जास्त खर्चाच्या भीतीने शेतकऱ्यांनी पीक घेतले नाही.

ब्रिटनमध्ये उपासमारीची परिस्थिती आहे का?

ब्रिटनमध्ये महागाईमुळे उपासमारीची स्थिती पाकिस्तानसारखीच झाली आहे. तिथल्या सर्वसामान्यांना विसरून जा, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही त्यांचे रोजचे जेवण परवडत नाही.

सर्वसामान्यांसोबतच शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही फूड बँकांवर अवलंबून राहावे लागते. यूकेमध्ये सुमारे 154 संस्था फूड बँकद्वारे लोकांना मोफत जेवण वाटप करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com