Ajay Banga: पुण्यात जन्मलेले अजय बंगा बनणार जागतिक बँकेचे अध्यक्ष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केले नॉमिनेट
Ajay Banga | World Bank
Ajay Banga | World BankDainik Gomantak
Published on
Updated on

Ajay Banga: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा यांना जागतिक बँकेच्या प्रमुखपदासाठी नॉमिनेट केले. भारतीय मूळ असलेले अजय बंगा हे जागतिक बँकेचे आगामी प्रमुख असू शकतात. यापुर्वी डेव्हिड मालपास हे जागतिक बँकेचे प्रमुख होते.

Ajay Banga | World Bank
Vrindavan Chandrodya Temple: 'बुर्ज खलिफा'लाही मागे टाकणार भारतातील 'हे' मंदिर

गेल्या आठवड्यात डेव्हिड मालपास यांनी राजीनामा दिला होता. यानंतर, जागतिक बँकेच्या वतीने असे सांगण्यात आले होते की त्यांच्याकडून लवकरच नवीन अध्यक्ष निवडला जाईल.

नवीन राष्ट्राध्यक्षांच्या नियुक्तीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, बंगा यांना हवामान बदलासह जगातील अनेक महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करण्याचा भरपूर अनुभव आहे, त्यादृष्टीने अमेरिकेने त्यांचे नाव सुचविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत अजय बंगा?

अजय बंगा हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन मिळाले आहे. बंगा यांचे पूर्ण नाव अजयपाल सिंग बंगा आहे. अजय सध्या 'जनरल अटलांटिक'चे उपाध्यक्ष आहेत. ही संस्था जगातील सर्वात मोठ्या खाजगी इक्विटी फर्मपैकी एक आहे.

याआधी ते क्रेडिट कार्ड कंपनी असलेल्या मास्टरकार्डचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ होते. अजय बंगा यांना अर्थकारण व्यवसायाचा सुमारे 30 वर्षांचा अनुभव आहे. मास्टरकार्ड या कंपनीत त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या आहेत. याशिवाय त्यांनी अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंकच्या संचालक मंडळातही काम केले आहे.

Ajay Banga | World Bank
Watch Video: ‘या अल्लाह 8 साल के लिए मोदी को हमारा PM बना दो’, पाकिस्तानी व्यक्तीने केली कळकळीची विनंती

भारताशी नाते

बंगा यांचे वय सध्या 64 आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथील सैनी या शीख कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल होते. ते तेव्हा पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे तैनात होते. त्यांचे मूळ कुटंब पंजाबमधील जालंधरचे आहे.

अजय बंगा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. आयआयएम अहमदाबादमधून ते एमबीए झाले आहेत. भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.

भारतासह जगातील 189 देश जागतिक बँकेचे सदस्य आहेत. बँकेचे सध्याचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची नियुक्ती अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात केली होती. मालपास यांनी काही दिवसांपूर्वीच येत्या जूनमध्ये मुदतपूर्व पद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मालपास यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com