US-Canada सीमेवर थंडीमुळे नवजात बालकासह भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

अमेरिकेला (US) लागून असलेल्या कॅनडाच्या सीमेवरुन एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. इथे थंडीमुळे एका भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
US-Canada Border
US-Canada BorderDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडाच्या सीमेवरुन एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. इथे थंडीमुळे एका भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका नवजात बाळाचाही समावेश आहे. तथापि, मानवी तस्करीचे संभाव्य प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. jaishankar) यांनी कुटुंबीयांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'कॅनडा-अमेरिका (America) सीमेवर एका अर्भकासह चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून धक्का बसला. मी यूएस आणि कॅनडामधील आमच्या राजदूतांना परिस्थितीवर तात्काळ मदत पोहोचविण्याचे सांगितले आहे. (Four Members Of An Indian Family Including A Child Die Due To Cold At The US Canada Border)

त्याच वेळी, मंटोबा रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) ने गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सांगितले की, बुधवारी कॅनडाच्या (Canada) बाजूने इमर्सनजवळील कॅनडा-अमेरिका सीमेवर चार मृतदेह सापडले, त्यात दोन प्रौढ व्यक्तींचे मृतदेह आहेत. किशोरवयीन तरुण आणि एका नवजात बाळाचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, असे मानले जात आहे की, मृत व्यक्ती भारतातून आले होते. ते कॅनडातून अमेरिकेच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.

US-Canada Border
मानवी मेंदूत बसणार आता मेमरी चीप; एलॉन मस्क प्रयोगाच्या आणखी जवळ

दोन्ही देशांच्या सीमेपासून 12 मीटर अंतरावर मृतदेह सापडले

RCMP सहाय्यक आयुक्त जेन मॅकक्लॅची यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आतापर्यंत मिळालेली माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, 'आज मी जी माहिती शेअर करणार आहे ती ऐकूण धक्का बसेल. हा नक्कीच हृदयद्रावक अपघात आहे. तपासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असे दिसते की, सर्वांचा मृत्यू थंडीमुळे झाला आहे. सीमेपासून नऊ ते 12 मीटर अंतरावर चार मृतदेह सापडले आहेत.

एका मानवी तस्कराला अटक करण्यात आली

वृत्तानुसार, मंटोबा आरसीएमपीला बुधवारी यूएस कस्टम्स आणि बॉर्डर डिफेन्स डिपार्टमेंटकडून माहिती मिळाली की, इमर्सनजवळील लोकांच्या एका गटाने सीमा ओलांडली. त्यानंतर लगेचच सीमेच्या दोन्ही बाजूंनी शोधमोहीम सुरु करण्यात आली. दरम्यान दुपारच्या सुमारास नवजात बालकांचे मृतदेह सापडले. मिनेसोटाच्या डिस्ट्रिक्टसाठी यूएस अॅटर्नीच्या कार्यालयाने गुरुवारी एका प्रकाशनात सांगितले की, स्टीव्ह शँड या 47 वर्षीय फ्लोरिडा व्यक्तीला या प्रकरणात मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com