Canada : आंदोलकांनी घराला घेराव घालताच पंतप्रधान कुटुंबासह पळाले

कॅनडामध्ये कोरोना लसीची सक्ती केल्यामुळे तीव्र विरोध होत आहे. त्यातच कॅनडाच्या पंतप्रधानांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, 'ट्रकचालक हे कोणतेही महत्त्व नसलेले अल्पसंख्याक' असे संबोधले.
Canada Protest
Canada ProtestDainik Gomantak

कॅनडामध्ये कोरोना लसीच्या सक्ती केल्यामुळे तीव्र विरोध होत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांचे कुटुंब घर सोडून गुप्त ठिकाणी गेले आहे. खरं तर, हजारो ट्रक चालक आणि इतर आंदोलक राजधानी शहरात जमले आणि त्यांनी पीएम ट्रुडो यांच्या निवासस्थानाला वेढा घातला. ट्रक चालकांनी त्यांच्या 70 किमी लांबीच्या काफिल्याला 'स्वातंत्र्य काफिला' असे नाव दिले आहे.

Canada Protest
NASA: 2 अब्ज वर्षांपूर्वीच मंगळावर होते पाण्याचे अस्तित्व

ट्रक चालकांचा काय राग?

ट्रुडो सरकारने ट्रक चालकांना अमेरिकेची(America) सीमा ओलांडण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक केले. यामुळे चालकांनी तेथे आंदोलन सुरू केले आहे. त्याच वेळी, कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी एक वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, 'ट्रकचालक हे कोणतेही महत्त्व नसलेले अल्पसंख्याक' असे संबोधले. यामुळे ते प्रचंड संतापले आहे. त्यांनी राजधानी ओटावाच्या वाटेवर तब्बल 70 किमी ट्रकची लाईन लावली आहे.

लसीकरण हा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग

तेथिल आंदोलकांनी कोविड (Covid) निर्बंधांची तुलना ही फॅसिझमशी केली. त्यांनी कॅनडाच्या ध्वजासोबत नाझी चिन्हे चे दाखवले आहेत. अनेक आंदोलकांनी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना लक्ष्य केले. मॉन्ट्रियल येथील डेव्हिड सँटोस म्हणाले की, लसीकरण अनिवार्य करणे हे आरोग्याशी संबंधित नाही, तर "गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी" सरकारने घेतलेला एक निर्णय आहे.

Canada Protest
न्यूझीलंडमधील गर्भवती महिला पत्रकार अफगाणिस्तानात अडकली

युद्ध स्मारकावर नाचले आंदोलक

आंदोलकांमध्ये लहान मुले, तरुण, महिला, वृद्ध, अपंग यां सर्वांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, काही लोकांनी आक्षेपार्ह आणि अश्लील विधानेही सुध्दा केली आहेत. हे लोक थेट पंतप्रधानांवर निशाणा साधत आहेत. काही आंदोलक हे प्रमुख युद्ध स्मारकावर नाचतांना दिसले. कॅनडाचे सर्वोच्च लष्करी जनरल वेन आयर आणि संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी या संदर्भात निषेध केला आहे.

10,000 लोकांचा संसदेला वेढा

कडाक्याच्या थंडीचा इशारा देऊनही शेकडो आंदोलक संसदेत दाखल झालेत. हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आहेत. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सुमारे 10,000 लोक संसदेत पोहोचले. सध्या संसदेच्या संकुलात किती आंदोलक उपस्थित आहेत, याचा नेमका आकडा पोलिसांकडे उपलब्ध नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com