ब्रिटनमध्ये राजकीय संकट अधिक गडद! ​​बोरिस जॉन्सनच्या 39 मंत्र्यांनी दिला राजीनामा

कंझर्व्हेटिव्ह पक्षातील बंडखोरीनंतर 39 मंत्री आणि संसदीय सचिवांनी राजीनामे दिले असल्याचे आता समोर आले आहे.
Boris Johnson
Boris JohnsonDainik Gomantak

दोन मंत्र्यांनी पायउतार झाल्यानंतर ब्रिटनमधील राजकीय संकट अधिकच गडद होताना आपल्याला दिसून येत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षातील बंडखोरीनंतर 39 मंत्री आणि संसदीय सचिवांनी राजीनामे दिले असल्याचे आता समोर आले आहे. गृहमंत्री प्रिती पटेल यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे सांगण्यात येत आहे. (The political crisis in Britain is even darker Boris Johnson 39 ministers resign)

Boris Johnson
या देशात खासगी Island विकणे आहे, 'मात्र...'

बुधवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी असेच आणखी एक पाऊल उचलले, ज्यामुळे त्यांची खुर्ची धोक्यामध्ये आली आहे. त्यांनी लेव्हलिंग-अप हाउसिंग आणि कम्युनिटीज सेक्रेटरी मायकेल गोव्ह यांना काढून टाकले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील बंडखोरी शमवण्यासाठी त्यांनी हे केले असल्याचे सांगितेले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधानांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. यानंतर त्यांना बोरिस जॉन्सन यांनी बडतर्फ केले. पुढे ते म्हणतात की अशी गोष्ट सार्वजनिक करायला नको होती. अशा स्थितीत बोरिस जॉन्सन यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ले करायला सुरुवात केली.

पार्टीगेट घोटाळ्यापासून बोरिस जॉन्सन हे त्यांच्याच मंत्र्यांच्या निशाण्यावरती आहेत. यानंतर ख्रिस पिंचर घोटाळ्यामुळे राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. बुधवारी संध्याकाळी किमान नऊ मंत्री डाऊनिंग स्ट्रीटवर पोहोचले आणि बोरिस जॉन्सन यांना पायउतार होण्यास सांगितले होते.

Boris Johnson
इम्रान खानला पाठिंबा देणाऱ्या न्यूज अँकरला पाक पोलिसांनी केली अटक

गृहमंत्री प्रिती पटेल या त्यांच्या मोठ्या सहकारी मानल्या जातात पण त्याही या संघामध्ये सामील होत्या. जॉन्सन यांनी सर्व मंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट देखील घेतली. खरे तर पुढच्या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाची स्थिती सुधारायची असेल तर नेतृत्वात बदल होणे गरजेचे असल्याचे मंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

अध्यक्षपद सोडण्यास तयार नसलेले जॉन्सन बोरिस

जॉन्सन यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले की, त्यांनी राजीनामा दिल्यास पक्षात खळबळ उडेल आणि पुढील निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारुण पराभव होणार आहे. राजीनाम्यामुळे लवकर निवडणुका घ्याव्या लागतील, असे जॉन्सन यावेळी म्हणाले. ख्रिस पिंचर यांच्या बढतीवरून अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी देखील राजीनामा दिला होता. साजिद जाविद यांनीही याच कारणामुळे राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी दोन नवीन मंत्र्यांना पंतप्रधानांनी जबाबदारी सोपवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com