सध्या पाकिस्तानला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे या देशाची अर्थव्यवस्था ढासळत असताना, राजकीय पटलावरही परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, एका प्रसिद्ध पत्रकाराच्या अटकेवरून पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे उघडपणे समर्थन करणारे पत्रकार इम्रान रियाझ खानला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान हे पाकिस्तानी मीडियातील एक प्रसिद्ध नाव असून देशातील प्रसिद्ध न्यूज अँकरमध्ये त्याची गणना केली जाते. (Anchor Imran Khan arrested)
अँकर इम्रान लष्करावर प्रश्न उपस्थित करत आहे
इम्रान रियाझ खानसोबत काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की, पोलिसांनी त्याला मंगळवारी इस्लामाबादच्या बाहेरून अटक केली. पोलिसांनी त्याला कोणत्या आरोपाखाली अटक केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही आठवड्यांपूर्वी न्यायालयाने इम्रान आणि इतर काही पत्रकारांना अटक न करण्याचे आदेश दिले होते. अनेक दिवसांपासून तो इम्रान खानचे जोरदार समर्थन करत आहेत आणि पाकिस्तानी लष्करावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
'मी माझं काम करत राहीन'
अँकर इम्रानवर लष्कराविरोधात द्वेष निर्माण केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अँकर इमरान तुरुंगात दिसत आहे. या व्हिडिओ फुटेजमध्ये तो उशी मागताना दिसत आहे. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नव्हत्या. दरम्यान, हे लोक आता तुम्हाला सोडतील का, असा प्रश्नही कोणीतरी विचारला असता, याला उत्तर देताना इम्रान 'बघू या यांनी सोडलं किंवा नाही सोडलं तरी मी माझं काम करत राहीन,' असे म्हणताना ऐकायला मिळत आहे.
हे अमेरिकेचे षडयंत्र
पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. त्याचवेळी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर अँकरच्या अटकेचा निषेध केला आहे. एप्रिलमध्ये संसदेत अविश्वास प्रस्तावाद्वारे इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते आणि शाहबाज शरीफ देशाचे नवे पंतप्रधान बनले होते. इम्रानने या संपूर्ण घटनेला अमेरिकेचे षडयंत्र म्हटले होते. मात्र, अमेरिकेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.