या देशात खासगी Island विकणे आहे, 'मात्र...'

या बेटावर एक झोपडी देखील आहे.
 Island
IslandDainik Gomantak
Published on
Updated on

Maine Private Island For Sale With Weird Condition: तुम्ही एखादे बेट विकत घेण्याचे स्वप्नातही पाहिले नसेल, परंतु अमेरिकेत एक संपूर्ण बेट विकले जात आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु त्याची किंमत खूपच कमी आहे. या बेटावर एक झोपडी देखील आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. होय, हे बेट खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागेल.

वास्तविक, अमेरिकेच्या (America) मेन राज्यात राहणारा बिली मिलिकेन आपले खाजगी बेट $3,33,900 मध्ये विकत आहेत, ज्याची भारतीय रुपयांमध्ये किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. परंतु त्यांनी या बेटाच्या (Island) खरेदीदारासाठी एक अट घातली आहे, ज्यामध्ये खरेदीदाराला या बेटावर एक रात्र घालवावी लागले.

 Island
World Largest Temple: जगातील सर्वात मोठे मंदिर कुठेयं तुम्हाला माहितीये का?

दरम्यान, 2007 पासून या बेटाची मालकी बिली मिलिकेन यांच्याकडे आहे. त्यांनी बेटावर एक रात्र घालवण्याच्या अटीमागचे कारण सांगितले की, 'खरेदीदाराने हे बेट खरेदी करण्यापूर्वी एकदा त्या बेटावर काय अडचणी येऊ शकतात हे पाहावे आणि त्याही समजून घ्याव्यात.'

 Island
World's Hottest Stone: जगातील सर्वात उष्ण खडक तुम्हाला माहितीये का?

या बेटावर काय खास आहे

हे बेट अमेरिकेच्या मेन स्टेटमधील जोन्सपोर्टपासून बोटीतून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. या बेटाचे क्षेत्रफळ 1.5 एकर आहे, जे पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहे. मात्र इथे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नाहीत. या बेटाचे मालक बिली मिलिकेन (Billy Milliken) सांगतात की, 'इथे मी फक्त एकच रात्र घालवली आहे. तर कुटुंबीयांनी संपूर्ण उन्हाळ्या सुट्ट्या या बेटावर घालवल्या. मात्र ते दिवसा राहून संध्याकाळी परत यायचे. या बेटावर एक कॉटेज देखील बांधले आहे. दिवसभर आराम करण्यासाठी आणि उन्हाळ्यात बेटावर वेळ घालवण्यासाठी हे सर्वोत्तम आहे. बंदरापासून त्याचे अंतर फक्त 10 मिनिटांचे आहे, त्यामुळे प्रवास करणे देखील सोपे आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com