पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस नागरिकांना मोठ्याप्रमाणात वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी नेत्यांचा भ्रष्टाचारही जनतेसमोर येत आहे. पाकिस्तानातील (Pakistan) राजकीय नेते भ्रष्टाचारावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. याच पाश्वभूमीवर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) च्या उपाध्यक्षा मरियम नवाझ (Maryam Nawaz) यांनी परदेशातून मिळालेल्या पैशांवरुन पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर जोरदार टीका केली. त्या यावेळी म्हणाल्या, इम्रान खान यांनी केवळ पैसे चोरले किंवा लपवले नाही तर लोकांना लुटले. जिओ न्यूजनुसार, मरियम म्हणाल्या, सततचे खुलासे आणि मिळत असलेले पुरावे पीटीआयला सत्तेपासून परावृत्त करण्यासाठी आवश्यक आहेत.
"इतिहासात इतर कोणत्याही पक्षाने इतके घोटाळे केले नाहीत. पाकिस्तानच्या इतिहासात इम्रान खानसारखा भ्रष्ट, लबाड आणि कारस्थानी राज्यकर्ता झाला आहे का? असा सवालही मरियम यांनी विचारला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (PPP) शाझिया मारी यांनीही इम्रान खान यांना चोर म्हटले आहे.
इम्रान खान यांनी पक्षाला परदेशातून मिळालेला पैसा लपवला: अहवाल
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाने परदेशी नागरिक आणि कंपन्यांकडून मिळालेला पैसा लपवला. तसेच बँक खातीही लपविल्याचे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे. या खुलाशानंतर पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी इम्रान खान यांना फटकारले आणि चोरही म्हटले.
खरं तर, डॉन वृत्तपत्राने पीटीआयच्या निधीची चौकशी करणाऱ्या पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) चौकशी समितीच्या अहवालाचा हवाला दिला आहे, की सत्ताधारी पक्षाने करोडो रुपयांचा पैसा लपवला आहे. पीटीआयने 2009 ते 2010 आणि 2012 ते 2013 या चार वर्षांच्या कालावधीत 31.2 लाख पाकिस्तानी रुपयांचा निधी कमी दाखवला होता.
शिवाय, वर्षनिहाय तपशील दर्शवतो की, एकट्या 2012-13 मध्ये विदेशी निधीची रक्कम 14.5 लाख रुपयांनी कमी करण्यात आली होती. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, या खुलाशानंतर पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट (पीडीएम) चे प्रवक्ते हाफिज हमदुल्ला म्हणाले, “तपास समितीच्या अहवालात इम्रान खान आणि पीटीआयच्या चोरीचा खुलासा झाला आहे. ते पुढे म्हणाले, इम्रान आणि पीटीआय अनेकदा इतरांवर चोरीचे आरोप करतात, परंतु ते स्वतःच चोर निघाले.
SBP मधील वास्तविक रक्कम काहीतरी वेगळी
ECP च्या तपास समितीने म्हटले आहे की, 2008 ते 2013 दरम्यान PTI ने निवडणूक आयोगाला सुमारे 1.33 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा अहवाल दिला होता. तर सेंट्रल बँक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अहवालानुसार वास्तविक रक्कम 1.64 अब्ज रुपये होती. इम्रान खान यांच्या पक्षाची एसबीपीमध्ये 26 बँक खाती आहेत. पाकिस्तानमधील सुमारे 1,414 कंपन्या, 47 विदेशी कंपन्या आणि 119 संभाव्य कंपन्यांनी खान यांच्या पीटीआयला निधी पुरवल्याचे अहवालात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.