तालिबानने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सुनावले खडेबोल

अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन केले पाहिजे या इम्रान खानच्या (Prime minister Imran Khan) वक्तव्यानंतर तालिबानचे हे उत्तर आले आहे.
Taliban warns to Pakistan Prime minister Imran Khan
Taliban warns to Pakistan Prime minister Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

तालिबान्यांनी आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तालिबानने (Taliban) पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांना स्पष्टपणे सांगितले आहे की पाकिस्ताला (Pakistan) इस्लामिक अमिरातला (Islamic Emirate) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)"सर्वसमावेशक" सरकार स्थापन करण्यास सांगण्याचा अधिकार नाही. अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन केले पाहिजे या इम्रान खानच्या वक्तव्यानंतर तालिबानचे (Taliban Government) हे उत्तर आले आहे. (Taliban warns to Pakistan Prime minister Imran Khan)

तालिबानचे प्रवक्ते आणि उपसूचना मंत्री जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला इस्लामिक अमिरातला अफगाणिस्तानमध्ये 'सर्वसमावेशक' सरकार स्थापन करण्यास सांगण्याचा अधिकार नाही. मुजाहिद यांनी डेली टाइम्सच्या एका प्रश्नावर हे वक्तव्य केले आहे ज्यात त्यांना पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तान सरकारवर केलेल्या ताज्या वक्तव्यावर तालिबानला उत्तर देण्यास सांगितले होते.

Taliban warns to Pakistan Prime minister Imran Khan
Pakistan: पुन्हा एकदा हिंदू कुटुंबाचा छळ...

यापूर्वी, तालिबानचे दुसरे नेते मोहम्मद मोबीन यांनीही पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले होते की, अफगाणिस्तानात कोणत्याही देशाला सर्वसमावेशक सरकार बनवण्यास सांगण्याचा अधिकार नाही. अफगाणिस्तानच्या एरियाना टीव्हीवरील एका डिबेट शो दरम्यान, मोहम्मद मोबीनने विचारले की सर्वसमावेशक सरकार म्हणजे शेजारील देशांचे प्रतिनिधी आणि हेरांना इस्लामिक इमिरेटच्या सरकारी व्यवस्थेत ठेवले जाते का ..? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान यापूर्वीच केलं होत.

दरम्यान नुकत्याच झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सदस्य देशांच्या नेत्यांनी एका आवाजात अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारची मागणी केली ज्यामध्ये सर्व धार्मिक आणि वांशिक गटांच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याचे सांगितले गेले. तसे, तालिबानने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी पाकिस्तानी मंत्र्याचा दावा फेटाळून लावला होता ज्यात त्यांनी दोन्ही देशांच्या चलन स्वॅपच्या व्यवस्थेबद्दल बोलले गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com