इम्रान खानने 'या' शब्दात सुनावले मोदी सरकारला

इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरवर पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.
PM Imran Khan

PM Imran Khan

Dainik Gomantak

Published on
Updated on

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सध्या भारतीय लष्कर दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आहे. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली असून शेजारील देशाचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्या वक्तव्यावरून त्याचा अंदाज येऊ शकतो. इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काश्मीरवर पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. इम्रान खान म्हणाले की, काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (United Nations Security Council) दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.

<div class="paragraphs"><p>PM Imran Khan</p></div>
ब्रिटनच्या बॅचलरने पत्नीच्या शोधात चाैकात लावला बॅनर

मोदी सरकार सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे खुलेआम उल्लंघन करत असून काश्मीरमधील लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली होणाऱ्या जनमत चाचणीसाठी UNSC ची वचनबद्धता अपूर्ण आहे. हिंदुत्ववादी मोदी सरकारने UNSC ठराव, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदे आणि चौथ्या जिनिव्हा अधिवेशनासह आंतरराष्ट्रीय अधिवेशनांचे उल्लंघन केले आहे. काश्मीरची परिस्थिती आणि लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न करताना त्यांनी युद्ध गुन्हा केला आहे.

ट्विटमध्ये, पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, "आंतरराष्ट्रीय बंधुत्वाने, विशेषत: संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरमधील भारताच्या युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांवर कारवाई केली पाहिजे." काश्मिरी लोक सतत भारताला विरोध करत आहेत. आत्मनिर्णयाच्या न्याय्य काश्मिरी संघर्षासाठी पाकिस्तान आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. काश्मीरबाबत इम्रान खान सातत्याने वक्तव्ये करत आहेत. पण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यात बाहेरचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असे भारत नेहमीच म्हणतो. पण ही गोष्ट इम्रान खानपर्यंत पोहोचत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com