
तुम्ही कधी कल्पना केली आहे का की अशी एखादी ट्रेन असू शकते ज्यामध्ये बसण्यासाठी सीट्स नाहीत, छत नाही आणि तरीही लोक त्यातून 14 तास प्रवास करतात? आणि तेही 50 अंश तापमानात कोणत्याही स्टॉपशिवाय, अगदी सहारा वाळवंटाच्या मधून... होय, ही काही चित्रपटाची कहाणी नाही तर मॉरिटानियाच्या "Iron Ore Train" ची वास्तविकता आहे. ही ट्रेन केवळ मालच वाहून नेत नाही तर मानवाच्या धैर्याची परीक्षा देखील घेते. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून या ट्रेनविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
ही ट्रेन मॉरिटानियाच्या उत्तरेला असलेल्या झौरात नावाच्या ठिकाणाहून धावते. हा भाग पश्चिम सहाराच्या सीमेवर असून तो अतिशय संवेदनशील मानला जातो. अल-कायदा सारख्या दहशतवादी (Terrorist) संघटना येथे सक्रिय आहेत. तरीही, ही ट्रेन दररोज धावते आणि तिला मॉरिटानियाची 'जीवनरेखा' म्हटले जाते.
सहारा वाळवंटात जगातील सर्वात मोठ्या लोहखनिजाच्या खाणी आहेत. या ट्रेनचा वापर या खाणींमधून अटलांटिक महासागराच्या काठावर असलेल्या नौधिबो शहरात खनिजांची वाहतूक करण्यासाठी केला जातो. म्हणूनच तिला Iron Ore Train म्हणतात.
या ट्रेनची लांबी सुमारे 3 किलोमीटर आहे.
ट्रेनमध्ये 200 पेक्षा जास्त डब्बे आहेत.
प्रत्येक डब्ब्यात अंदाजे 84 टन लोहखनिज असते.
ट्रेनला दोन इंजिन आहेत.
संपूर्ण प्रवासात ट्रेन कुठेही थांबत नाही.
जरी ही ट्रेन सामान वाहून नेण्यासाठी बनवली गेली असली तरी स्थानिक लोक अजूनही त्यामधून प्रवास करतात. ही ट्रेन स्वस्त आणि जलद प्रवासासाठी ओळखली जाते. पण त्यात बसण्याची अजिबात सोय नाही. लोक लोहखनिजावर बसतात. दिवसा कडक उन्हात आणि रात्री थंडीमुळे हा प्रवास जीवघेणा ठरु शकतो.
जर कोणाला या ट्रेनमधून प्रवास करायचा असेल त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित चौम स्टेशन आहे. पण लक्षात ठेवा जर तुम्ही वाटेत काही अडचणीत अडकलात तर मदत मिळत नाही. मोबाईल नेटवर्क नाही, पोलिस नाहीत, वैद्यकीय सुविधा नाही.
उन्हाळ्यात तापमान 50 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते.
रात्री 5 अंशांपेक्षा कमी तापमान
दहशतवाद्यांचा धोका कायम
ही ट्रेन 1963 पासून सहारा वाळवंटात धावत आहे. तिला कधीकधी "ट्रेन डू डेझर्ट" असेही म्हणतात, ज्याचा अर्थ वाळवंटातील ट्रेन असा होता.
ही ट्रेन मॉरिटानियाचा आर्थिक कणा आहे. लोहखनिजाची निर्यात हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भाग आहे. या ट्रेनद्वारे, खाणींमधून समुद्री बंदरांपर्यंत लोह खनिजाची वाहतूक (Transportation) केली जाते, ज्यामुळे देश लाखो डॉलर्सची कमाई करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.