China Philippines Tensions: चीनची ‘दादागिरी’; फिलिपाइन्सच्या नौदलावर केला गलवानसारखा हल्ला

China Philippines Tensions: चीनने पुन्हा एकदा गलवानसारखी घटना घडवली आहे. यावेळी त्यांनी दक्षिण चीन समुद्रात फिलिपाइन्सच्या नौदलाला लक्ष्य केले आहे.
China Philippines Tensions
China Philippines TensionsDainik Gomantak

China Philippines Tensions: चीनने पुन्हा एकदा गलवानसारखी घटना घडवली आहे. यावेळी त्यांनी दक्षिण चीन समुद्रात फिलिपाइन्सच्या नौदलाला लक्ष्य केले. हातोडा आणि चाकू घेऊन आलेल्या चिनी सैनिकांनी फिलिपिनो सैनिकांना घेरले आणि त्यांच्या बोटींवर हल्ला केला.

फिलिपिनो अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चिनी सैनिकांनी आमच्या नौदलाच्या सैनिकांना दुसऱ्या थॉमस शोल येथे तैनात असलेल्या सैनिकांना खाद्यान्न आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि नौकांवर हल्ला केला. वास्तविक, दुसऱ्या थॉमस शोलबाबत चीनने वाद निर्माण केला आहे. चीन (China) आपल्या नकाशात या भागाला दाखवून दावा सांगतो. तर इतर थॉमस शोल फिलिपाइन्सच्या ताब्यात आहेत. 1999 मध्ये फिलिपाइन्सच्या नौदलाचे जहाज शोलवर उतरले होते. जे फिलिपाइन्समधील पलावानच्या पश्चिमेला 105 नॉटिकल मैलावर आहे. हे एक विवादित क्षेत्र असून तैवान आणि व्हिएतनामसह इतर शेजारील देश देखील या व्यस्त जलमार्गावर दावा सांगतात.

China Philippines Tensions
America China Tension: अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा तणाव; चिनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा ड्रॅगनचा आरोप

चिनी सैनिक आठ मोटरबोटमधून आले

यावरुन चीन आणि फिलिपाइन्समध्ये (Philippines) संघर्ष सुरु आहे. यावेळी, चिनी कोस्ट गार्डचे जवान आठ मोटरबोटींमध्ये आले आणि त्यांनी फिलिपाइन्स नौदलाच्या दोन बोटींवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर ते फिलीपीन नौदलाच्या बोटींवर चढले आणि त्यांनी आठ एम 4 रायफल जप्त केल्या, असे फिलिपाइन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले. ही शस्त्रे बॉक्समध्ये भरलेली होती.

हल्ल्यात फिलिपाइन्सचे नौदलाचे जवान जखमी झाले

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फिलीपीन नौदलाच्या जवानांवर हल्ला केला, ज्यामध्ये अनेकजण जखमी झाले. यातील एका जवानाला उजव्या हाताचा अंगठा गमवावा लागला. फिलिपाइन्स आर्मीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक फिलीपाईन नौदलाचे जवान आणि त्यांच्या बोटींना घेरुन त्यांच्यावर हल्ले करताना दिसत आहेत.

China Philippines Tensions
China Taiwan Tension: 20 चिनी विमाने अन् ड्रोनची तैवानच्या सीमेत घुसखोरी, ड्रॅगनच्या मनात आहे तरी काय?

गलवानमध्ये काय घडलं...

2020 मध्ये, 15-16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यातील LAC वर भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली होती. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कोल्ड वेपन्स श्रेणीतील कंबाइन्ड मेसेज शस्त्रे वापरली होती. या चकमकीत भारताकडून एका कमांडरसह 20 जवान शहीद झाले होते. मात्र, किती चिनी सैनिक मारले गेले याबाबत चीनने कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. या चकमकीत चिनी सैनिकही मारले गेल्याचा दावा भारताकडून करण्यात आला. नंतर चीनने सांगितले की, गलवानमध्ये त्यांचे 4 सैनिक मारले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com