Nigeria: लहान मुले आणि महिलांसह नायजेरियात 200 लोकांचे अपहरण

Kidnapping of 200 people: मानवाधिकार समन्वयक मोहम्मद फाल सांगतात की, अपहरण झालेल्या लोकांच्या संख्येबद्दल अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. पण ही संख्या 200 पेक्षा कमी नाही.
Kidnapping of 200 people in Nigeria
Kidnapping of 200 people in Nigeria

Kidnapping of 200 people in Nigeria:

नायजेरियामध्ये सर्वसामान्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. नुकतेच समोर आलेल्या एका प्रकरणात, दहशतवाद्यांनी उत्तर नायजेरियात मुले आणि महिलांसह 200 लोकांचे अपहरण केले आहे.

अपहरण करण्यात आलेले पीडित महिला हिंसाचारामुळे शेजारील चाडच्या सीमेजवळ लाकूड गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी या सर्वांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. नायजेरियातील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाने ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोर्नियो प्रांतातील गांबोरू नगाला कौन्सिल भागातील विस्थापितांच्या शिबिरातून बाहेर आलेल्या पीडितांना दहशतवाद्यांनी घेरले आणि ओलीस ठेवले. कारवाया थांबवण्यासाठी या भागात दररोज अपहरण, खुनाच्या घटना घडतात.

दरम्यान, नायजेरियास्थित युनायटेड नेशन्सचे मानवाधिकार समन्वयक मोहम्मद फाल सांगतात की, अपहरण झालेल्या लोकांच्या संख्येबद्दल अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. पण ही संख्या 200 पेक्षा कमी नाही.

Kidnapping of 200 people in Nigeria
Pakistani Citizens: पाकिस्तानच्या 5 जणांना सौदीमध्ये फाशी, वाचा काय आहे प्रकरण

बोर्नोमध्ये इस्लामिक कायदा लागू करण्यासाठी दहशतवाद्यांनी 2009 मध्ये अत्याचार सुरू केले. बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या हिंसाचारात आतापर्यंत 35,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एवढेच नाही तर या काळात 20 लाखांहून अधिक विस्थापित झाले आहेत.

Kidnapping of 200 people in Nigeria
Sweden Officially Joins Nato Military Alliance: स्वीडन बनला अधिकृतरित्या नाटोचा 32 वा सदस्य

यापूर्वी मंगळवारी, मिलिशियाच्या नेत्यांनी सांगितले होते की, दहशतवाद्यांनी नायजेरियाच्या ईशान्य भागात 47 महिलांचे अपहरण केले आहे.

दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू असलेल्या बोर्नो राज्यात शुक्रवारी झालेल्या हल्ल्यासाठी त्याने इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP) ला जबाबदार धरले. 2009 पासून या हल्ल्यांमध्ये 35 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com