Pakistani Citizens: पाकिस्तानच्या 5 जणांना सौदीमध्ये फाशी, वाचा काय आहे प्रकरण

Saudi Arabia: सौदी अरेबिया खून आणि दहशतवादी हल्ले तसेच अंमली पदार्थांची तस्करी आणि तस्करी प्रकरणात दोषी ठरलेल्यांना फाशीची शिक्षा देते.
 Five Pakistani Citizens Sentenced To Death In Saudi Arabia
Five Pakistani Citizens Sentenced To Death In Saudi Arabia
Published on
Updated on

Five Pakistani Citizens Sentenced To Death In Saudi Arabia:

सौदी अरेबियामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे 5 पाकिस्तानी नागरीकांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी पाच पाकिस्तानी नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. एका कंपनीवर दरोडा टाकून एका गार्डची हत्या केल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत. हे सर्व नागरिक पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या संदर्भात सौदी मंत्रालयाचे म्हणणे आहे की, ज्या पाकिस्तानींना दोषी ठरवण्यात आले त्यांनी खासगी क्षेत्रातील कंपनीवर दरोडा टाकला होता.

आरोपींना यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दोन सुरक्षारक्षकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर हल्ला केला. तेथे एका बांगलादेशी सुरक्षारक्षकाची हत्या करण्यात आली.

तपासाअंती या पाच जणांना सक्षम न्यायालयात पाठवण्यात आले, जेथे ते दोषी आढळले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

 Five Pakistani Citizens Sentenced To Death In Saudi Arabia
Israel-Hamas Ceasefire Updates: 21 वर्षांपासून इस्रायली तुरुंगात असणारा बरघौती होणार पॅलेस्टाईनचा नवा राष्ट्राध्यक्ष? हमास सुटकेवर ठाम

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, दोषींनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील केले होते. मात्र उच्च न्यायालयांनी हा निर्णय कायम ठेवला. नंतर शाही आदेशाने फाशीची शिक्षा निश्चित केली.

या सर्व आरोपींना मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावण्यात देण्यात आली. सौदी अरेबिया खून आणि दहशतवादी हल्ले तसेच अंमली पदार्थांची तस्करी आणि तस्करी प्रकरणात दोषी ठरलेल्यांना फाशीची शिक्षा देते.

 Five Pakistani Citizens Sentenced To Death In Saudi Arabia
Sweden Officially Joins Nato Military Alliance: स्वीडन बनला अधिकृतरित्या नाटोचा 32 वा सदस्य

यापूर्वी जानेवारी महिन्यात ४ इथिओपियन नागरिकांना फाशी दिल्याचे प्रकरण समोर आले होते. तेव्हा सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, सुदानी नागरिकाच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेल्या चार इथिओपियन स्थलांतरितांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

त्यानंतर गृह मंत्रालयाने म्हटले होते की, पीडितेवर एक एक करून जीवघेणे हल्ले करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com