Taliban: ''जिवंत लोकांचे फोटो काढू नका...'' तालिबानचा सरप्राईजिंग फर्मान; लॉजिकही गमतीशीर!

Taliban Order: तालिबान सातत्याने महिला आणि अल्पसंख्याकांवर निर्बंध लादणारे फर्मान जारी करत आहे. यातच आता, त्याने एक अनोखा आदेश जारी केला आहे.
Taliban
TalibanDainik Gomatak
Published on
Updated on

Taliban Order: तालिबान सातत्याने महिला आणि अल्पसंख्याकांवर निर्बंध लादणारे फर्मान जारी करत आहे. यातच आता, त्याने एक अनोखा आदेश जारी केला आहे, ज्यानुसार त्याने जिवंत मानव आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास बंदी घातली आहे.

लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांना आदेश जारी करताना, कंदाहारमधील तालिबान सरकारने म्हटले आहे की जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढणे चुकीचे आहे. जर कोणी असे करत असेल तर त्याला आळा घालावा आणि अधिकाऱ्यांनी तसे होणार नाही याची खात्री करावी. कंदाहार हे ते ठिकाण आहे, जिथून तालिबानचा उदय झाला. 2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर या कट्टरतावादी संघटनेने (तालिबान) अफगाणिस्तानमध्ये स्वतःचे सरकार स्थापन केले आहे.

दरम्यान, तालिबानने (Taliban) जारी केलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे की, जिवंत लोकांची छायाचित्रे घेतल्यास त्यांना इतर वस्तूंच्या तुलनेत जास्त नुकसान होते. अशा परिस्थितीत कोणत्याही औपचारिक किंवा अनौपचारिक परिषद, बैठक किंवा कार्यक्रमात लोकांचे फोटो काढू नयेत. छायाचित्रणामुळे निर्जीव वस्तूंना त्यांच्यापेक्षा जास्त नुकसान होते. हा नियम सरकारी कार्यक्रमांनाही लागू होणार असून कोणत्याही सभेत फोटो काढले जाणार नाहीत. तथापि, या बैठकांबद्दल लिखित आणि ऑडिओ रिपोर्ट जारी केला जाऊ शकतो.

Taliban
Taliban Meeting: तालिबानने बोलावलेल्या बैठकीत भारताचा सहभाग, रशियासह इतर दहा देशांनी लावली हजेरी

दरम्यान, हा हुकूम काढताना तालिबानने इस्लामिक आर्टमध्ये मानव आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास मनाई असल्याचा तर्क दिला आहे. याबाबत कंदाहारच्या राज्यपालांच्या प्रवक्त्याला विचारले असता, तसा आदेश जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे फक्त सरकारी अधिकाऱ्यांनाच लागू होईल. तालिबानचे प्रवक्ते महमूद आझम म्हणाले की, 'हा निर्णय सामान्य लोक आणि स्वतंत्र माध्यमांसाठी नाही.'

Taliban
पाकिस्तानी दहशतवादी संघटना Tehreek-e-Taliban चा प्रमुख पहिल्यांदाच जगासमोर, पाहा दुर्मिळ व्हिडिओ

याआधीही 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची सत्ता होती. तेव्हाही कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने जिवंत लोकांचे फोटो काढणे आणि व्हिडिओ बनवणे यावर बंदी घातली होती. इतकेच नाही तर सुमारे अडीच वर्षांपूर्वी सत्तेत परतल्यानंतर तालिबानने अनेक माध्यम संस्थांना जिवंत लोकांची छायाचित्रे वापरण्यापासून रोखले आहे. तथापि, तालिबानचे उच्च अधिकारी स्वत: इतर देशांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीची छायाचित्रे शेअर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com