Watch Video: '...तर संपूर्ण मीडिया हाऊस बंद करेन', तालिबान नेत्याचा व्हिडीओ व्हायरल!

Taliban In Afghanistan: ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात मोठे सत्तांतरण झाले. अशरफ घनी यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबानने सत्ता स्थापन केली.
 Taliban
Taliban Dainik Gomantak

Taliban In Afghanistan: ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात मोठे सत्तांतरण झाले. अशरफ घनी यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबानने सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन करताच तालिबानने 90 च्या दशकातील राजवटीची पुनरावृत्ती करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, तालिबान (Taliban) प्रत्येक दिवसागणिक महिलांवर नवीन नियम लादत आहे, अलीकडेच, एका तालिबान शासकाने अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजला दिलेल्या ऑन एअर मुलाखतीत मीडिया हाऊस बंद करण्याची धमकी दिली.

 Taliban
Taliban: भयानक! चोरी केली म्हणून तालिबानने भर स्टेडियममध्ये दिली 'ही' शिक्षा...

तसेच, अफगाणिस्तानातील (Afghanistan) मीडिया हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलांनी कार्यालयीन वेळेत हिजाब नीट परिधान केला नाही किंवा कामाच्या वेळी त्यांच्या पुरुष कर्मचाऱ्यांशी जवळीक साधली, तर मी स्वतः त्या मीडिया हाऊसवर कारवाई करेन, असे तालिबान नेत्याने म्हटले आहे.

'म्हणून प्रसारमाध्यमांनी निर्बंधांसाठी तयार राहावे'

खुद्द अफगाणिस्तानमधील पत्रकार नातीक मलिकजादा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तालिबानी नेता धमकी देत ​​आहे की, 'आम्ही मीडिया हाऊसमध्ये सक्तीने हिजाब घालण्यास सांगत आहोत, महिला पत्रकारांनी त्यांच्या कार्यालयात पुरुष कर्मचाऱ्यांशी जास्त जवळीक साधू नये. जर हे नियम पाळले नाहीत तर आम्ही ते बंद करु.'

 Taliban
Taliban China: ड्रॅगनची तेल निती ! तालिबान-चीन आले एकत्र; काय होणार भारतावर परिणाम

अलीकडेच, मंगळवारी (17 जानेवारी) तालिबानने चोरीच्या आरोपाखाली चार लोकांचे हात निर्दयीपणे कापले. त्याचबरोबर लग्नापूर्वी संबंध ठेवल्याच्या आरोपावरुन तरुणांना चाबकाचे फटके मारण्याचे आदेशही दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com